Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Video: .तर लोणावळा येथे अन्सारी कुटुंब बचावले असते

Video: .तर लोणावळा येथे अन्सारी कुटुंब बचावले असते

पुणे : पुणे शहरातील हडपसर भागातील अन्सारी कुटुंब लोणावळ्याला रविवारी (ता. ३०) फिरण्यासाठी गेले होते. भुशी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पावसाचा आनंद घेत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला अन् त्यामध्ये 9 जण अडकले.

त्यातील चार जणांना वाचवण्यात यश आले. मात्र एक महिला आणि चार मुले वाहून गेले. या घटनेमुळे अन्सारी कुटुंबावर दुखाःचा डोंगर कोसळला आहे.

पुण्यातील अन्सारी कुटुंब पर्यटनासाठी लोणावळ्याला गेले होते. मात्र त्यानंतर हे कुटुंब भुशी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडाल्याची घटना घडली आहे. भुशी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पावसाचा आनंद घेत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला अन् त्यामध्ये 9 जण अडकले. त्यातील चार जणांना वाचवण्यात यश आले. मात्र, एक महिला आणि चार मुले वाहून गेले. यातील चार जणांचा मृतदेह हाती लागला आहे, मात्र अद्यापही एकाचा शोध सुरू आहे.

दरम्यान, या घटनेबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे बंदी असताना देखील हे कुटुंब या धबधब्याकडे गेले आणि कुटुंबातील सदस्यांना आपला जीव गमावला लागला. सूचना फलकावरील सूचनेचं पालन केलं असत तर कदाचित जीव वाचला असता. लोणावळ्यात पर्यटन करताना ‘सावधानता बाळगा’ असा इशारा देऊन ही पर्यटक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे, भुशी डॅम परिसरात फिरायला आलेल्या पर्यटकांना प्रशासनाने सूचना फलकाद्वारे सूचित केले आहे, मात्र तरी देखील पर्यटक याकडे कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे.

१) साहिस्ता लियाकत अन्सारी (वय 36),
२) अमिमा आदिल अन्सारी (वय13),
३) उमेश आदिल अन्सारी (वय 8) या तीन जणांचे मृतदेह सापडले असून
4) अदनान सबाहत अन्सारी (वय 4),
5) मारिया अकिल सय्यद (वय 9) यांचा शोध अद्याप लागलेला नाही.

Video: लग्नसमारंभासाठी आलेले अन्सारी कुटुंब लोणावळा येथे गेले अन्…

धक्कादायक Video: लोणावळा येथील भुशी डॅमवर कुटुंब गेलं वाहून…

भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय अन् नाशिकमध्ये जोरदार राडा…

माजी आमदाराला अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी…

पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची शेअर मार्केटच्या नावाखाली आर्थिक फसवणूक!

'कुमार महाराष्ट्र केसरी' सूरज निकमची आत्महत्या…

पोलिसकाकाच्या 'टॉप १०' Video News आणि Youtube channel…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post Video: …तर लोणावळा येथे अन्सारी कुटुंब बचावले असते appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka