Dailyhunt
विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे पत्नीला समजले अन्.

विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे पत्नीला समजले अन्.

डेहराडून (उत्तराखंड) : एका विवाहीत महिलेची अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हृषीकेशमधील नीळकंठ रोडवरील धांधला पानी भागात विवाहित महिलेची हत्या झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या प्रियकराची पत्नी व बहीण व एका युवकाला अटक केली आहे.

नीळकंठ रोडवरील धांधला पानी येथे एका विवाहित महिलेची हत्या झाली होती. त्याबाबत पोलिसांनी मंगळवारी (ता. 28) खुलासा केला. विवाहबाह्य संबंधांवरून ही हत्या झाली आहे. प्रियकराची पत्नी, बहीण व एका युवकाला अटक केली असून न्यायालयात सादर केलं. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांना धांधला पानी येथे 25 मे रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. महिलेच्या गळ्यावर काही खुणा दिसल्या. त्यामुळे हत्या व पुरावे लपवण्याच्या आरोपाखाली एसआय लक्ष्मण सिंह कुंवर यांनी अज्ञातांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता, जानकी सेतू या ठिकाणी घटना घडण्याच्या आधी महिला काही लोकांसोबत दिसल्याचे सीसीटीव्ही फूटेजमध्ये आढळून आले होते.

मृत महिला झारखंडमधील करमपूर येथील अनिता देवी असल्याचे पोलिसांनी सांगितले. झारखंडमधीलच ममता, बबिता देवी आणि हरियाणाच्या गुडगावमधील निवासी ओमवीर हे तिघे आरोपी असून त्यांना अटक करण्यात आली आहे. बबिताचा नवरा रंजितशी अनिताचे अनैतिक संबंध असल्याचे पत्नीला समजला होते. विवाहित महिलेशी अनैतिक संबंधांमुळे रंजित त्याची पत्नी व बहिणीला मारहाण केली होती. तिघांनी मिळून अनिता देवी हिला मारण्याचा कट रचला आणि हत्या केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

अनैतिक संबंधाला कटाळून महिलेची आत्महत्या; हातावर लिहीले की…

आत्याने भाच्यासोबत ठेवले अनैतिक संबंध अन् गरोदरानंतर मिळाली मोठी शिक्षा…

महिलेची अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून हत्या अन्…

पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशय अन् एक दिवस…

वहिनीसोबत प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंध अन् एकदा…

The post विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे पत्नीला समजले अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka