Dailyhunt
महिलेची अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून हत्या अन्.

महिलेची अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून हत्या अन्.

ळगाव : मुक्ताईनगर तालुक्यात एका महिलेची (वय ३८) शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी पाचच्या सुमारास दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना महालखेडा शिवारात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येत असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

महालखेडा येथे राहणारी महिला शेतात सकाळी काम करायला गेली होती. काम आटोपून घरी परतत असताना त्यांची हत्या करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महिला घरी न परतल्याने कुटुंबियांनी शेतात शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळून आला. दगडाने ठेचून हत्या केल्याने महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

महिलेच्या अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेसोबत एका पुरुषाचे अनैतिक संबंध होते. त्याच मुद्द्यावरून महिलेसोबत त्याचा वाद व्हायचा. वादातूनच त्याने दगडाने ठेचून आणि शरिरावर, गळ्यावर धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याची माहिती पुढे येत आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशय अन् एक दिवस…

पुणे शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्रानेच केली मित्राची हत्या…

पत्नीचे अनैतिक संबंध अन् कुटुंबातील चौघांचे मृतदेह…

दिर आणि वहिणीचे अनैतिक संबंध अन् जीव गेला चिमुकल्याचा…

सूनेचे सासऱ्याशी होते अनैतिक संबंध अन् एक दिवस…

The post महिलेची अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून हत्या अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka