Dailyhunt
यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरपणे हत्या; आरोपी कोण पाहा.

यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरपणे हत्या; आरोपी कोण पाहा.

वी मुंबई : नवी मुंबई येथील यशश्री शिंदे (वय २०) या युवतीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्यानंतर खळबळ उडाली आहे. यशश्री हिची हत्या दाऊद शेख नावाच्या व्यक्तीने केल्याचा आरोप यशश्री हिच्या वडिलांनी केला आहे.

आरोपी फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

यशश्री गुरुवारपासून (ता. २५) बेपत्ता होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री तिचा मृतदेह उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या निर्जन रस्त्यावर आढळून आला. यशश्रीचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला आहे. यशश्रीच्या गुप्तांगावर गंभीर जखमा होत्या, तसेच तिच्या चेहऱ्यासह शरीरावरही वार करण्यात आले आहेत. यशश्री शिंदेच्या हत्येमुळे वातावरण तापले आहे. यशश्री शिंदेची निर्घुण हत्या करणाऱ्या आरोपीला तात्काळ फासावर लटकवा, अशी घोषणाबाजी करत हजारो नागरिकांनी रविवारी उरण पोलिस ठाण्यावर अक्रोश मोर्चा काढला, या मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

यशश्रीचा खून करणाऱ्या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची चार पथके रवाना झाली आहेत. आरोपी सतत आपलं लोकेशन बदत असल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर विभागाचे सहय्यक पोलिस आयुक्त डॉ. विशाल नेहून यांनी दिली.

दाऊद शेख हा मूळचा कर्नाटकचा रहिवासी असून उरण येथे ड्रायव्हरचे काम करत होता. त्याची यशश्री सोबत भेट झाली होती. पोलिसांच्या माहितीनुसार याच मुलीच्या संदर्भात त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता आणि त्यातच त्याला तुरुंगवासही झाला होता. काही महिन्यांपूर्वी तो बाहेर आला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुलीच्या संपर्कात आल्यानंतर ही घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीच्या जवळच्या सहकाऱ्यांना व परिवारातील लोकांना ताब्यात घेतले असून 4 टीम बंगळूरूला रवाना केल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसकाका Video News: २९ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

सातारा जिल्हा हादरला! आईने चिमुकलीसह घेतली कृष्णा नदीत उडी…

वरळी स्पा सेंटर हत्याकांडात मोठं ट्विस्ट आले समोर…

नात्याला काळीमा! अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समजताच आईला बसला धक्का…

'सैराट'ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून युवकाची हत्या…

The post यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरपणे हत्या; आरोपी कोण पाहा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka