Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
युवतीच्या मृतदेहाचं गुढ उलगडलं; प्रेमविवाहाचा वादातून केली हत्या अन्.

युवतीच्या मृतदेहाचं गुढ उलगडलं; प्रेमविवाहाचा वादातून केली हत्या अन्.

त्रपती संभाजीनगर : वडगाव कोल्हाटी येथील साबळे कुटुंब टेम्पोतून गावी जात असताना तिसगाव चौफुली येथे त्यांच्या गादीत संशयास्पदरीत्या काहीतरी गुंडाळले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी गादी उघडून पाहिले असता त्यामध्ये नंदिनी राजू धिवरे (वय २०) या युवतीचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेचा उलगडा झाला असून, आईनेच गळा आवळून संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

प्रेमप्रकरणाला विरोध करत आईने मुलीचा प्लास्टिक पाइपने गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह गादीत गुंडाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न तिसगाव चौफुली पुलाजवळ पोलिस तपासात उघड झाला. १९ फेब्रुवारीला रात्री डायल ११२ पथकाला तिसगाव चौफुली पुलाजवळ एका टेम्पोमध्ये संशयास्पदरीत्या गादी व घरगुती साहित्य नेले जात असल्याची माहिती टेम्पो चालकाद्वारेच मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता एक महिला व पुरुष आढळले. त्यांच्या शेजारी प्लास्टिकचा ड्रम आणि दोरीने घट्ट बांधलेली गादी होती. चौकशीदरम्यान उत्तरे समाधानकारक न वाटल्याने पथकाने गादी उघडून पाहिली. त्यामध्ये युवतीचा मृतदेह आढळला होता. यावेळी लेकीने आत्महत्या केल्याचे आईने सांगितले. मात्र, शवविच्छेदनात गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. आई भारती उमेश साबळे (वय ३५) हिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मृत युवतीचे कन्नड येथील युवकासोबत प्रेमसंबंध होते. विवाहासाठी ती आग्रह धरत होती; मात्र आईचा विरोध होता. मागील काही दिवसांपासून घरात वाद सुरू होते. त्यातूनच खून केल्याचे तपासात समोर आले.

दरम्यान, आम्हाला घरातील साहित्य गावी न्यायचं आहे म्हणत वडगाव पासून तिसगाव चौफुलीपर्यंत टेम्पो भाड्याने केली. टेम्पो चालकाने ड्रम, कपडे व इतर साहित्याबरोबर एका गादीमध्ये काहीतरी गुंडाळलेलं असल्याच दिसले. साहित्य भरताना त्याच्या लक्षात आलं, त्याने त्यांना तिसगाव चौफुली येथे सोडताच 112 ला फोन करून सांगितले की, त्या गादीमध्ये काहीतरी ठेवलेले साहित्य आहे, त्यात काही संशयास्पद आहे. पोलिसानी त्यांना चौफुली येथे चौकशी केली असता पुढील घटना उघड झाली. मुलीचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे तिने गळफास घेतला. आम्ही गावी घेऊन निघालो होतो, असे आईने सांगितले होते.

पोलिसांनी या प्रकरणी आई भारती उमेश साबळे (वय 35) आणि सावत्र वडील उमेश गोविंद साबळे (वय 40, रा. वडगाव कोल्हाटी) यांना ताब्यात घेतले आहे. माहितीनुसार, नंदिनीने काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. सुरुवातीचा संसार सुरळीत सुरू असला, तरी दोन-तीन महिन्यांपूर्वी पतीने तिला सोडून दिल्याने ती माहेरी परतली. या घटनेचा तिच्यावर मानसिक परिणाम झाल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते. दरम्यान, पतीपासून विभक्त झाल्यानंतर तिचे दुसऱ्या एका तरुणाशी संबंध जुळल्याची माहिती पुढे आली. या नव्या नात्यामुळे घरात वारंवार वाद होत असल्याचेही उघड झाले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! पोलिसांनी गादी उघडली अन् दिसला युवतीचा मृतदेह…

भिगवणच्या युवतीने पोलिसांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात काय म्हटले पाहा…

नगर हादरलं! अल्पवयीन मुलीवर पाच दिवस जंगलात लैंगिक अत्याचार…

भिगवण अपहरण प्रकरण! युवती मध्यरात्री पोहचली पोलिस ठाण्यात अन् म्हणाली…

'स्तन पकडणे, पायजम्याची नाडी ओढणं अत्याचार नाही' म्हणणाऱ्या अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्दबातल…

प्रेमविवाहानंतर पत्नीने अश्लिल चाळे करतानाचा व्हिडिओ पाहिला अन्…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka