Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
युवतीने केली 13 दिवसांमध्ये 3 लग्न अन् हनिमूनच्या वेळी.

युवतीने केली 13 दिवसांमध्ये 3 लग्न अन् हनिमूनच्या वेळी.

भोपाळ (मध्य प्रदेश): विवाहाच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढले असून, अनेकांची फसवणूक होत आहे. एका युवतीने तेरा दिवसांत तीन लग्न केली. लग्नाच्या पहिल्या रात्री म्हणजे हनिमूनच्यावेळी तिने या तिघांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.

पोलिसांनी या वधूसह तिच्या टोळीतल्या चौघांना अटक केली आहे.

लुटारू वधूने तेरा दिवसांत एकामागून एक तीन विवाह केले आणि तिन्ही वरांना लुटले. या वधूला एक प्रियकर असून, पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. लुटारू वधूसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. लुटारू वधूच्या पहिल्या पतीला तिच्या बॉयफ्रेंडविषयी माहिती मिळाली आणि इंदूर पोलिसांत तक्रार केली. लुटारू वधूने त्याला 15 लाखांचा गंडा घातला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

महिलेची टोळी वृत्तपत्र आणि मॅट्रोमोनियल साइटच्या जाहिरातीच्या मदतीने वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढत असे. विवाहानंतर वधू आणि तिचा बनावट नातेवाईक लाखो रुपये घेऊन करून फरार होत होते. फिर्यादीच्या तक्रारीनंतर इंदूर गुन्हे शाखा सक्रिय झाली आणि तपासात धक्कादायक माहिती उघड झाली. पोलिसांनी सांगितले, फिर्यादीच्या तक्रारीवरून प्रकरणाचा तपास सुरू केला असता त्यात पोलिसांना आरोप सिद्ध होणाऱ्या अनेक गोष्टी आढळून आल्या. त्यानंतर वधू बनून लोकांना लुटणाऱ्या युवतीसह तिच्या चार साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

मुंबईतल्या दीपेश नावाच्या व्यक्तीला खोटे नाव सांगून त्याच्याशी युवतीने विवाह केला. त्यानंतर काही महिन्यांत त्याला सोडून खोटी कागदपत्रं तयार करून राजस्थानमधल्या लक्ष्मण नावाच्या युवकाशी विवाह केला. तिने फिर्यादीशी विवाह करून त्याला घरजावई करून घेतल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या पतीला इंदूरमध्ये घरजावई बनवून या महिलेने दुसऱ्या आणि तिसऱ्या पुरुषाशी विवाह केला आणि तीन दिवसांत दोघांकडून पैसे घेऊन गायब झाली. एकूण 13 दिवसांत तीन विवाह केले. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

धक्कादायक! बदलापूरच्या आरोपीची झाली 3 लग्न; पाहा त्याची कुंडली…

नवरी लग्नानंतर एकच रात्र नवरदेवा सोबत राहायची अन् हळूच…

एक-दोन नव्हे तर ५० पेक्षा जास्त जणांसोबत महिलेने केले लग्न…

प्रेम, लग्न आणि पत्नीचे उच्च शिक्षण; पत्नी म्हणते कोण तो? ओळखत नाही…

अहमदनगर जिल्ह्यात सिमरनने 8 महिन्यांत केली 9 लग्न; अखेर डाव फसला…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka