Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
धक्कादायक! बदलापूरच्या आरोपीची झाली 3 लग्न; पाहा त्याची कुंडली.

धक्कादायक! बदलापूरच्या आरोपीची झाली 3 लग्न; पाहा त्याची कुंडली.

ठाणे : बदलापूरमधील नामांकित शाळेत चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. चिमुकलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे (वय २४) याची तीन लग्न झाल्याची माहिती समोर येत आहे.

सर्वात म्हणजे तिन्ही बायका त्याला सोडून गेल्या आहेत.

बदलापूरच्या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादराला आहे. या घटनेच्या निषेधार्थ सध्या शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे. आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे. आरोपी अक्षय शिंदे याचे तीन लग्न झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्वात म्हणजे तिन्ही बायका त्याला सोडून गेल्या आहे.

आरोपी अक्षय शिंदे याला आज सकाळी कल्याण कोर्टात व्हीसीद्वारे हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचे वकीलपत्र घेण्यास कल्याणमधील वकिलांनी नकार दिला हे विशेष. आरोपी राहात असलेल्या खरवई गावातही संतप्त नागरिकांनी त्याच्या घराची तोडफोड केली आहे. दरम्यान स्पेशल SIT टीमच्या प्रमुख आरती सिंग यांनी अज्ञात ठिकाणी पीडित मुलींचा जबाब नोंदवला. पीडित मुलीची आई आणि आजोबा यांचा देखील जबाब नोंदवण्यात आला.

कोण आहे अक्षय शिंदे…
अक्षय शिंदेचे वय 24 वर्षे
अक्षयचे शिक्षण दहवीपर्यंत
अक्षय शिंदे बदलापूर येथील एका शाळेचा शिपाई
या आधी अक्षय एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता
एका कंत्राटामार्फत आदर्श शाळेत शिपाई म्हणून लागला
अक्षय, आई-वडील आणि त्याचा भाऊ आणि भावाची बायको असे त्याचे कुटुंब.
अक्षयची तीन लग्न झाली होती. मात्र, तिनही बायका सोडून गेल्या होत्या
अक्षय शिंदे हा कर्नाटकातील गुलबर्गा या गावातील मुळ रहिवासी
मात्र अक्षयचा जन्म बदलापूरमधील खरवई गावात
बदलापूर पूर्व येथील खरवई गावातील एका चाळीमध्ये तो राहतो.
अक्षयचे नातेवाईक अक्षयच्या शेजारी राहत होते. त्यांच्याही घराची तोडफोड गावकऱ्यांनी केली आहे.
तोडफोडीनंतर अक्षय यांचे कुटुंब सध्या खरवई बदलापूर या गावातून गायब.
अक्षय यांच्या शेजारी राहणाऱ्या काही महिलांची चर्चा केली असता त्यांनी अक्षयचे तीन वेळा लग्न झाल्याची माहिती दिली.
त्याच्यासोबत आत्ता एकही पत्नी राहत नाही अशी माहिती दिली आहे.

Video: बदलापूरातील शाळेत चिमुकलींवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे आहे कोण?…

बदलापूर आंदोलकांवर कारवाई; 300 जणांवर गुन्हा तर 28 जणांना अटक…

बदलापूर हादरलं! दोन चिमुकल्यांवरील अत्याचाराची A टू Z कहाणी…

बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी पोस्ट पाहा…

आळंदीमध्ये वारकरी संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मुलावर महाराजाकडून बलात्कार…

संतापजनक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या चिमुकलीचा घोटला गळा अन्…

धक्कादायक! महाराष्ट्रातील चिमुकलीवर पंरप्रांतीय व्यक्तीने केला बलात्कार…

जळगाव जिल्ह्यात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; जमाव संतप्त…

बीड हादरलं! चिमुकलीवर पडक्या रूममध्ये सामूहिक बलात्कार…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka