Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न!

वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न!

वाघाळे: वाघाळे (ता. शिरूर) येथील कालिका माता यात्रा उत्सव दोन दिवस मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी मंगळवारी (ता. २४) ग्रामपंचायत प्रशासन यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने भव्य पालखी मिरवणूक, काठीची मिरवणूक काढून देवीला साडीचोळी अर्पण केली.

सायंकाळी विठाबाई भाऊ (मांग) नारायणगांवकर यांचा लोकनाट्य तमाशाचा नागरिकांसह पै-पाहुण्यांनी आनंद लुटला.

बुधवारी (ता. ८) सकाळी तमाशाचा हजेरीचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यासह विविध ठिकाणांहून आलेल्या पहिलवानांनी सहभाग नोंदवला. आनंदराव सोनवणे, राजेंद्र भोसले, सुहास काटे यांनी पहिलवानांच्या कुस्त्या लावल्या. कुस्त्यांचा आखाडा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी 'एकापेक्षा एक' या मराठी व हिंदी गाण्यांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. आर्केस्ट्रालाही मोठा प्रतिसाद मिळाला.

वाघाळे गावामध्ये यात्रेनिमित्त अनेक हॉटेलधारकांनी दुकाने थाटली होती. लहान मुलांना खेळण्यासाठी विविध खेळ उपलब्ध झाले होते. महिलांनी खरेदीचा आनंद लुटला. दोन दिवस मोठ्या उत्साहात यात्रा पार पडली. रांजणगाव एमआयडीसीच्या पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

वाघाळे गावची यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत वाघाळे, कालिका माता यात्रा कमिटी वाघाळे यांचे योगदान लाभले. यावेळी लहुशेठ थोरात, संचालक खरेदी-विक्री संघ शिरूर, राजेंद्र भोसले अध्यक्ष कुस्तीगीर संघ शिरूर, उपसरपंच राजेंद्र धायबर, सुहास काटे अध्यक्ष शेतकरी संघटना, दिलीप थोरात मा. चेअरमन, आनंदराव सोनवणे मा. चेरमन, अमोल धरणे मा. सरपंच, जयेंद्रकुमार सोनवणे, वैभव गावडे उदयोजक, ओंकार थोरात अध्यक्ष कलासागर प्रतिष्ठाण, गौतम कारकूड मुंबई पोलीस, अशोक शेळके पुणे पोलिस, दिलीप थोरात (गुरुजी), सामाजिक कार्यकर्ते संदीप धायबर, किसनराव गोरडे, शरद धायबर, संतोष गोरडे, गजानन थोरात, बाळासाहेब शेळके, विशाल शेळके, अमित सोनवणे, दिगंबर बढे, संदीप शेळके, वाल्मिक गावडे, बाळासाहेब सोनवणे, अशोक कारकूड, पप्पू पवार, नानासाहेब थोरात, श्री जय जवान संघाचे सदस्य यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

वाघाळे गावच्या उपसरपंचपदी राजेंद्र धायबर यांची बिनविरोध निवड

Video: वाघाळे गावात बिबट्याने पोल्ट्री फार्ममधून पाळीव कुत्रा नेला उचलून…

वाघाळे येथून वाघेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Shirur Taluka