Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Video: वाघाळे येथे ग्रामस्थांचा वाढदिवस सामूहिकरित्या साजरा.

Video: वाघाळे येथे ग्रामस्थांचा वाढदिवस सामूहिकरित्या साजरा.

शिरूर: शिरूर तालुक्यातील वाघाळे गावातील मान्यवरांचा १ जून रोजी सामूहिकरित्या वाढदिवस लहू थोरात (संचालक खरेदी विक्री संघ शिरूर तालुका) यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा केला.

गावामधील अनेकांचा एकत्रित वाढदिवस साजरा करण्यात आल्यानंतर सर्वांचाच आनंद व्दिगुणित झाला होता.

वाघाळे गावातील आदर्श शिक्षक संजय जगताप यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. त्यानंतर अधिक मासानिमित्त धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाचा आस्वाद ग्रामस्थांनी घेतला. कार्यक्रमानिमित्त संतोष महाराज खेडकर (संस्थापक, भक्ती वेदांत वारकरी शिक्षण संस्था खंडाळे) यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा आनंद ग्रामस्थांनी घेतला. सदर कार्यक्रमाची संकल्पना दिलीप थोरात (मा. उपसरपंच/मा. चेअरमन वि. का. सोसायटी वाघाळे) व ओंकार थोरात (अध्यक्ष, कलासागर प्रतिष्ठान) यांची होती.

कैलासराव सोनवणे (मा. संचालक घोडगंगा सहकारी कारखाना), संतोष लांडे पाटील (उद्योगपती), सुजित पवार, सदानंद अण्णा थोरात (उद्योजक) या मान्यवरांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली. मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा देताना आयोजीत करण्यात आलेल्या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे कौतुक केले.

दिलीप थोरात, ओंकार थोरात, संतोष गोरडे, राजेंद्र धायबर (उपसरपंच/ मा. चेअरमन), अशोकराव सोनावणे (मा. व्हा. चेअरमन), राजेंद्र भोसले (मा.उपसरपंच), सुहास काटे (अध्यक्ष, शेतकरी संघटना शिरूर), किसनराव गोरडे (मा. ग्रामपंचायत सदस्य), बाळाभाऊ थोरात (मा. ग्रामपंचायत सदस्य), विशाल शेळके (तज्ञ संचालक), संदीप धायबर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

वाघाळे येथील कविता धायबर यांचा 'आदर्श महिला' पुरस्काराने दिल्लीत सन्मान!

वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न!

वाघाळे येथून वाघेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान…

Loading…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Shirur Taluka