सध्या सोशल मीडियावर एक मोठा वाद निर्माण झाला आहे. सागर पवार यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे किल्ले गोपाळगड नेमका कोणाचा, यावर सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
सध्या सोशल मीडियावर एक मोठा वाद निर्माण झाला आहे. सागर पवार यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे किल्ले गोपाळगड नेमका कोणाचा, यावर सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
नेमका वाद काय?
गोपाळगड हा कोकणातील एक प्रसिद्ध किल्ला आहे. इथे शेकडो पर्यटक रोज भेट देतात. सागर पवार नावाचा एक फूड ब्लॉगर देखील येथे फिरायला गेला. गडावर फिरत असताना तेथील आंब्याच्या झाडावरून पडलेले २-३ आंबे त्याने उचलले. हेच आंबे उचलल्यामुळे त्याला तेथे किल्ल्यावर रोखण्यात आलं. हा किल्ला सरकारी नाही, तर आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, असा दावा इम्तियाज मनियार यांनी केला. इम्तियाज मनियार यांनी थेट हा किल्ला आपल्या मालकीचा असल्याचा दावा केल्याने गोपाळगड किल्ल्याच्या मालकीबाबत आता मोठा वाद सोशल मीडियावर होत आहे.
गोपाळगडचा इतिहास?
गोपाळगड किल्ला हा आधी आदिलशाहकडे होता. नंतर हा किल्ला शिवरायांनी जिंकला. त्यानंतर सिद्दी, कान्होजी आंग्रे यांच्याकडे हा किल्ला गेला. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र सरकारने ही जागा ओसाड जमीन म्हणून घोषित केली. १९६० मध्ये एका तलाठ्याने या किल्ल्याचा लिलाव केला व हा किल्ला ३०० रुपयांत विकला गेला.
सद्यस्थिती - शासनाचा निर्णय
किल्ल्याची होणारी हेळसांड पाहता, शिवप्रेमी, दुर्गप्रेमी आणि विविध संस्थांनी (जसे की गिरिमित्र प्रतिष्ठान) याच्या विरोधात दीर्घकाळ लढा दिला व आंदोलने केली. या आंदोलनांची दखल घेत सरकारने अखेर हा ऐतिहासिक किल्ला खासगी ताब्यातून सोडवून शासकीय मालमत्ता म्हणून घोषित केला.
CNG Rate Hike : महागाईचा फटका! मुंबईत सीएनजी महागलं, नवे दर काय?
नेमका वाद काय?
गोपाळगडचा इतिहास?
सद्यस्थिती - शासनाचा निर्णय

