Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
म्यानमारच्या कथित छळछावणीत बीडचा स्वप्नील; कुटुंबाची सरकारकडे आर्त हाक

म्यानमारच्या कथित छळछावणीत बीडचा स्वप्नील; कुटुंबाची सरकारकडे आर्त हाक

मोठ्या पगाराच्या नोकरीचे स्वप्न… आणि त्याच स्वप्नाचे भीषण दुःस्वप्न झाले आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील नांदूर घाट येथील स्वप्नील काळुंखे याला डेटा एन्ट्रीच्या नोकरीचे आमिष दाखवून परदेशात नेण्यात आल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे.

मात्र, आता तो म्यानमार-थायलंड सीमेवरील कथित छळछावणीत अडकला असून त्याच्याकडून जबरदस्तीने सायबर गुन्हे करून घेतले जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. काम करण्यास नकार दिल्यास मारहाण, विजेचे शॉक, पाण्यात उलटे टांगून अमानुष छळ केला जात असल्याचाही दावा करण्यात आला आहे. तसेच दिवसातून केवळ दहा मिनिटेच कुटुंबीयांशी बोलण्याची परवानगी दिली जात असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणाची दखल घेत माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन केंद्र सरकारच्या मदतीने स्वप्नीलसह तेथे अडकलेल्या भारतीय तरुणांची सुखरूप सुटका करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, स्वप्नीलची पत्नी, आई, वडील आणि सासऱ्यांनी मुख्यमंत्री, परराष्ट्रमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भावनिक साद घालत स्वप्नीलला सुखरूप मायदेशी आणण्याची विनंती केली आहे. बीड जिल्ह्यातील नांदूर घाट गावातील स्वप्नील काळुंखे… घरचा कर्ता मुलगा… पत्नीचा आधार… आणि दीड वर्षांच्या चिमुकल्याचा बाबा… मोठ्या पगाराच्या नोकरीच्या आशेने तो ४ जून रोजी बँकॉकला गेला. मात्र, त्यानंतर त्याला म्यानमारमध्ये नेण्यात आल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे.

स्वप्नीलची पत्नी संगीता काळुंखे सांगतात की, डेटा एन्ट्रीच्या नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्या पतीला परदेशात नेण्यात आले. मात्र, आता त्यांच्याकडून दिवसाचे १६ ते १८ तास जबरदस्तीने काम करून घेतले जात आहे. काम करण्यास नकार दिल्यास मारहाण, विजेचे शॉक आणि अमानुष छळ केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच स्वप्नीलसह भारतातील ७०० ते ८०० तरुण तिथे अडकल्याचे स्वप्नीलने फोनवर सांगितल्याचेही त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री, परराष्ट्रमंत्री आणि पंतप्रधानांनी तातडीने हस्तक्षेप करून स्वप्नीलला सुखरूप मायदेशी आणावे, अशी त्यांनी विनंती केली.

स्वप्नीलचे वडील भारत काळुंखे म्हणाले की, संपूर्ण कुटुंब स्वप्नीलवर अवलंबून आहे. नोकरीसाठी गेलेल्या मुलावर असा छळ होत असल्याचे समजल्यानंतर संपूर्ण कुटुंब हादरले आहे. सरकारने मुलाला तातडीने मायदेशी आणावे, अशी त्यांची मागणी आहे. स्वप्नीलचे सासरे रमेश बहादुरसिंग सांगतात की, बँकॉकमध्ये नोकरी असल्याचे सांगून स्वप्नीलला नेण्यात आले. मात्र, त्यानंतर त्याला म्यानमारमध्ये नेऊन जबरदस्तीने ऑनलाइन गॅम्बलिंग आणि सायबर फसवणुकीशी संबंधित कामे करण्यास भाग पाडले जात असल्याचा दावा त्यांनी केला. काम न केल्यास अमानुष छळ केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे स्वप्नीलच्या सुटकेची मागणी केली.

Sachin Ahir : ठाकरेंना धक्का, सचिन अहिरांनी शिवसेनेकडून भरला उपसभापतीपदाचा अर्ज

हिंजवडीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी PMRDAचा मोठा निर्णय; ४ जोडरस्ते नव्याने होणार

मोठ्या पगाराच्या नोकरीचे स्वप्न… आणि त्याच स्वप्नाचे भीषण दुःस्वप्न झाले आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील नांदूर घाट येथील स्वप्नील काळुंखे याला डेटा एन्ट्रीच्या नोकरीचे आमिष दाखवून परदेशात नेण्यात आल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे. मात्र, आता तो म्यानमार-थायलंड सीमेवरील कथित छळछावणीत अडकला असून त्याच्याकडून जबरदस्तीने सायबर गुन्हे करून घेतले जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. काम करण्यास नकार दिल्यास मारहाण, विजेचे शॉक, पाण्यात उलटे टांगून अमानुष छळ केला जात असल्याचाही दावा करण्यात आला आहे. तसेच दिवसातून केवळ दहा मिनिटेच कुटुंबीयांशी बोलण्याची परवानगी दिली जात असल्याचे सांगितले जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra