Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ओमराजेंना शिंदेंचा सहारा..राजे काय निर्णय घेणार ?

ओमराजेंना शिंदेंचा सहारा..राजे काय निर्णय घेणार ?

वनराजे निंबाळकर यांच्या हत्येतील आरोपींना कोर्टाने पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्त केलं. त्यामुळे आता ओमराजे निंबाळकर हे काय भूमिका घेतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.ओमराजे निंबाळकर हे देखील शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या

पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येतील आरोपींना कोर्टाने पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्त केलं. त्यामुळे आता ओमराजे निंबाळकर हे काय भूमिका घेतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.ओमराजे निंबाळकर हे देखील शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र आपण आपला राजकीय निर्णय काय असेल याबाबत आपली भूमिका २० तारखेच्या कोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट करू, असे ओमराजे म्हणाले होते.परंतु आज कोर्टाने पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील सर्व आरोपींना पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्त केलं आहे. यावर ओमराजे निंबाळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या निर्णयाविरोधात ते हायकोर्टात जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

https://youtu.be/aw8B8rdQDrI?si=aFRVIfL1avRaTjtA

परंतु आपला राजकीय निर्णय काय असेल, यावर त्यांनी अद्यापही प्रतिक्रिया दिलेली नाही. आपण आपला राजकीय निर्णय हा मतदारसंघात गेल्यानंतर घेणार आहोत. तसेच उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर मी टीका केलेली नाही. माझा राजकीय निर्णय काहीही असेल, पण मी त्यांच्यावर टीका करणार नाही, असे ओमराजे म्हणाले आहेत.एकीकडे त्यांच्या राजकीय निर्णयावर लक्ष लागून असतानाच एकनाथ शिंदे यांनी पवनराजे निंबाळकर हत्याकांडाबाबत कोर्टाच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा निकाल अनपेक्षित आहे. या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार आहोत. तसेच देशाचे गृहमंत्री यांच्याबरोबर देखील या निर्णयाबाबत चर्चा करणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.त्यामुळे येणाऱ्या काळात ओमराजे निंबाळकर हे शिंदे सेनेत दिसतील का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

हाकेंची पुन्हा भुजबळांवर टीका? 'त्या' व्हिडिओत नेमकं काय? | Laxman Hake Viral Video

हिंजवडीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी PMRDAचा मोठा निर्णय; ४ जोडरस्ते नव्याने होणार

https://youtu.be/aw8B8rdQDrI?si=aFRVIfL1avRaTjtA

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra