Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
८० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह चार वर्षे फ्रीजरमध्ये

८० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह चार वर्षे फ्रीजरमध्ये

NEWS डंका 3 weeks ago

मलाडमधील क्लिनिकमध्ये मृतदेह जतन

मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ८० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह तब्बल चार वर्षांपासून मलाडमधील एका वैद्यकीय क्लिनिकच्या फ्रीजरमध्ये ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

२०२२ मध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. कुटुंबीयांनी मृतदेह जतन करून ठेवण्याची सूचना क्लिनिक प्रशासनाला केली होती. भविष्यातील वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करता येईल, अशी आशा कुटुंबीयांना असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांना गुप्त स्त्रोताकडून या प्रकाराची माहिती मिळाली. त्यानंतर मलाडमधील संबंधित क्लिनिकमध्ये मृतदेह ठेवण्यात आल्याचे समोर आले. माहितीनुसार, मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह जतन करून ठेवण्यास सांगितले होते. मृत्यूच्या धक्क्यातून सावरता न आल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच अमेरिकेतील क्रायोनिक्स केंद्रात मृतदेह दीर्घकाळ जतन करण्याची त्यांची इच्छा होती. मृत व्यक्तीची पत्नी आणि प्रौढ मुले मुंबईतच राहतात. मृतदेह क्लिनिकमध्ये ठेवण्यात आला असताना कुटुंबीय किंवा क्लिनिक व्यवस्थापनाने पोलिसांना याबाबत माहिती दिली नव्हती.

क्रायोनिक्स म्हणजे काय?

क्रायोनिक्समध्ये मृत्यूनंतर मानवी शरीर अत्यंत कमी तापमानात जतन केले जाते. भविष्यात वैद्यकीय विज्ञान आणि तंत्रज्ञानात इतकी प्रगती होईल की मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करणे शक्य होईल, या आशेवर ही प्रक्रिया केली जाते. मात्र मानवी शरीराचे अशा प्रकारे दीर्घकाळ जतन करून भविष्यात पुनरुज्जीवन करण्याची संकल्पना अद्याप प्रायोगिक टप्प्यात आहे.

:

भारत-पाक सीमेजवळ महामार्गावर उतरले लष्कराचे हेलिकॉप्टर

इराणचा संयुक्त राष्ट्रांवर 'शोले' स्टाईल हल्लाबोल

बडगाममध्ये लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख दहशतवादी मूसा ठार

काठुआत सीआयएसएफ जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार

भारतामध्ये क्रायोनिक्सला स्पष्टपणे परवानगी देणारा किंवा त्यावर थेट बंदी घालणारा स्वतंत्र कायदा सध्या नाही. मात्र मृतदेह जतन करण्याचा मुद्दा घटनात्मक, फौजदारी आणि वैद्यकीय कायद्यांशी संबंधित ठरतो. सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांनुसार, संविधानातील कलम २१ अंतर्गत जीवन आणि प्रतिष्ठेचा अधिकार मृत व्यक्तीच्या मृतदेहाच्या सन्माननीय वागणुकीशीही संबंधित आहे. त्यामुळे मृतदेहाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याचे न्यायालयीन भूमिकेतून स्पष्ट झाले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka