Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दुबईचा व्हिडीओ दिल्ली विमानतळाचा म्हणून पसरवला; ६३ खात्यांवर कारवाई

दुबईचा व्हिडीओ दिल्ली विमानतळाचा म्हणून पसरवला; ६३ खात्यांवर कारवाई

NEWS डंका 1 month ago

दिल्ली विमानतळ प्रशासनाकडून दखल

नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी साचल्याचा दावा करणाऱ्या खोट्या पोस्ट शेअर करणाऱ्या सोशल मीडिया खात्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

दिशाभूल करणाऱ्या पोस्ट आणि व्हिडीओविरोधात दिल्ली विमानतळ प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड म्हणजेच DIALने ६३ सोशल मीडिया अकाउंट्सविरोधात दिल्ली पोलिसांकडे एफआयआर दाखल केली आहे. या अकाउंट्सवर विमानतळावरील परिस्थितीबाबत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

DIALच्या माहितीनुसार, या सोशल मीडिया अकाउंट्सवर दिल्ली विमानतळावर मोठ्या प्रमाणात पूर किंवा जलमय परिस्थिती निर्माण झाल्याचे दाखवणारे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले होते. या पोस्टमुळे विमानतळाच्या कामकाजावर परिणाम झाल्याचा गैरसमज निर्माण होत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. विशेष म्हणजे, अशाच एका पोस्टमध्ये दुबई विमानतळावरील पाणी साचल्याचा जुना व्हिडीओ दिल्ली विमानतळाचा असल्याचा दावा करून शेअर करण्यात आला होता.

या प्रकाराला गंभीरपणे घेतले असून, अशा प्रकारची दिशाभूल करणारी माहिती सार्वजनिक गैरसमज निर्माण करण्यासोबतच महत्त्वाच्या सार्वजनिक सुविधेची प्रतिमा खराब करू शकते, असे म्हटले आहे. प्रवाशांमध्ये विमानतळाच्या प्रत्यक्ष परिस्थितीबाबत अनावश्यक चिंता निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचाही दावा प्रशासनाने केला आहे.

ब्रिक्सच्या व्यासपीठावर मोदी-जिनपिंग भेटणार! गलवाननंतर प्रथमच आमनेसामने चर्चा

अफगाण वैद्यकीय विद्यार्थ्यांना पाकिस्तान सोडण्याचे आदेश

मुंबई विमानतळाजवळील अनधिकृत मशिदीवर चालणार बुलडोझर

सेन्सेक्स ८१३ अंकांनी कोसळला

दरम्यान, ४ सप्टेंबर रोजी दिल्ली परिसरात काही तासांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. DIALच्या माहितीनुसार, दुपारी २.३० ते संध्याकाळी ५.३० या तीन तासांत विमानतळ परिसरात सुमारे ७२.२ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे टर्मिनल-३च्या आगमन परिसरात काही काळ पाणी साचले होते. मात्र, विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विमानतळावरील पथकांनी तातडीने काम सुरू केले आणि सुमारे २० मिनिटांत साचलेले पाणी हटवण्यात आले. विमानतळाचे कामकाज सुरक्षितपणे आणि नियमानुसार सुरू राहिले, असा दावा DIALने केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka