Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बेंगळुरूत विनाहेल्मेटबद्दल दंड.नंतर कळले ते होते गिटार!

बेंगळुरूत विनाहेल्मेटबद्दल दंड.नंतर कळले ते होते गिटार!

NEWS डंका 3 weeks ago

एआय कॅमेऱ्याने घातला घोळ

बंगळुरूमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी दुचाकीच्या मागे बसलेल्या व्यक्तीवर ५०० रुपयांचा दंड ठोठावला. मात्र, या प्रकरणात वेगळेच सत्य बाहेर आले आणि सगळ्यांचे हसे झाले.

एआय कॅमेऱ्यामुळे मोठा गोंधळ झाला.

बेंगळुरूचे रहिवासी सौविक दत्ता हे आपल्या पत्नीची दुचाकी चालवत होते. ते स्वतः हेल्मेट घालून एकटेच प्रवास करत होते. त्यांच्या पाठीवर गिटार बांधलेले होते. मात्र, बंगळुरूतील एआय-आधारित वाहतूक कॅमेऱ्याला त्यांच्या मागे बसलेली व्यक्ती असल्याचे भासले आणि त्या कथित पिलियन रायडरने हेल्मेट घातले नसल्याचे मानून ५०० रुपयांचे चलन जारी करण्यात आले.

दत्तांनी या प्रकाराची माहिती समाजमाध्यमावर दिली. त्यांनी 'एक्स'वर बंगळुरू वाहतूक पोलिसांना टॅग करत, आपण पत्नीची दुचाकी एकट्याने चालवत होतो आणि पाठीवर गिटार होते, असे स्पष्ट केले. तसेच चुकीच्या पद्धतीने जारी करण्यात आलेले चलन रद्द करण्याची विनंती केली.

ई-कॉमर्स दिग्गजांवर सीसीपीएची मोठी कारवाई

परंपरा तुरुंगात पाठवण्याची नसून प्रमोशन देण्याची आहे…

इन्स्टाग्रामवर सोने-रोकडचा दिखावा; यूट्यूबरच्या घरातून लाखोंचा ऐवज लंपास

बांगलादेशात ड्रममध्ये सापडला हिंदू व्यक्तीचा मृतदेह

या प्रकरणातील सर्वात मजेशीर बाब म्हणजे चलनासोबत जोडण्यात आलेला पुरावाही होता. छायाचित्रात सौविक दत्ता स्पष्टपणे हेल्मेट घातलेले दिसत होते. त्यांच्या मागे कोणतीही व्यक्ती नव्हती; त्यांच्या पाठीवर व्यवस्थित बांधलेले गिटार होते. मात्र, एआय प्रणालीने या गिटारलाच पिलियन रायडर समजल्याचे दिसून आले.

दत्तांनी हे चलनही समाजमाध्यमावर शेअर केले. विशेष म्हणजे हे चलन त्यांच्या पत्नीच्या खात्यावर पाठवण्यात आले होते. यानंतर बंगळुरू वाहतूक पोलिसांनी त्यांच्या पोस्टची दखल घेतली आणि दंडाची रक्कम रद्द करून घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया करण्यास सांगितले. मात्र, या घटनेची चर्चा एवढ्यावरच थांबली नाही. ही पोस्ट रेडिटवर पोहोचल्यानंतर समाजमाध्यमांवर या एआय कॅमेऱ्याची जोरदार खिल्ली उडवण्यात आली. काही वापरकर्त्यांनी गिटारसाठी विनोदी प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी एआयच्या प्रतिमा ओळखण्याच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले.

एआय तंत्रज्ञानामुळे वाहतूक नियमांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न होत असला, तरी या घटनेने प्रतिमा ओळखणाऱ्या प्रणालींसमोर मानवी पडताळणीचे महत्त्वही अधोरेखित केले आहे. बंगळुरूच्या एआय कॅमेऱ्याला रस्त्यावरची प्रत्येक गोष्ट ओळखता येत असली, तरी गिटारला गिटार म्हणून ओळखण्याचे प्रशिक्षण अजून थोडे बाकी असल्याचे या घटनेने दाखवून दिले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka