Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दिल्लीत रिपब्लिक चॅनेलच्या महिला पत्रकाराशी 'कॉक्रोच'चे गैरवर्तन

दिल्लीत रिपब्लिक चॅनेलच्या महिला पत्रकाराशी 'कॉक्रोच'चे गैरवर्तन

NEWS डंका 1 month ago

गैरवर्तनाचा आरोप

नवी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर शुक्रवारी, ४ सप्टेंबर रोजी एका महिला पत्रकाराला आंदोलकांच्या जमावाने घेरल्याचा आणि तिच्याशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे.

संबंधित पत्रकार रिपब्लिक चॅनेलची असल्याचे वृत्त असून ती घटनास्थळी वार्तांकन करत असताना मोठ्या संख्येने लोकांनी तिला घेरल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

व्हिडिओनुसार, पत्रकाराच्या आजूबाजूला प्रामुख्याने पुरुषांचा जमाव जमा झाला होता. काही जण तिच्याकडे बोट दाखवत होते, तर काहींनी घोषणा देण्यास सुरुवात केली. अनेक जण मोबाईलवर या संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण करत होते. या वेळी पत्रकाराला आपले वार्तांकन करण्यास अडथळा निर्माण झाल्याचे दिसून येते. या वेळी जमावाकडून पत्रकाराविरोधात 'गोदी मीडिया' अशा घोषणा दिल्याचेही वृत्त आहे.

S-400 खरेदीसाठी रशियासोबत ५० हजार कोटींची डील?

नेपाळमधील महाप्रलयातील मृतांचा आकडा १,३४४ वर

सहारनपूरमध्ये अनधिकृत मशिदीवर बुलडोझर

ना सिमेंट, ना काँक्रीट… सिंधू नदीवर भारताने उभारला पहिला 'रॉक डॅम'

संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एका प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान कॉकरोच जनता पार्टी संबंधित एका तरुणीच्या वडिलांवर हल्ला केल्याचा आरोप सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर स्वतंत्र भारद्वाज यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात कारवाईची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी स्वतंत्र भारद्वाज यांना उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधून ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka