Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'जेन झी'ची काही लोकांनी दिशाभूल केली!

'जेन झी'ची काही लोकांनी दिशाभूल केली!

NEWS डंका 2 weeks ago

माजी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे वक्तव्य

माजी केंद्रीय शिक्षणमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी सांगितले की, नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर झालेल्या आंदोलनादरम्यान काही लोकांनी जेन झी अर्थात तरुण पिढीची 'दिशाभूल' करण्याचा प्रयत्न केला होता, असे उद्गार माजी केंद्रीय शिक्षणमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी काढले.

या प्रकरणावर प्रथमच सविस्तर मौन सोडताना प्रधान म्हणाले की, केंद्रीय मंत्रिपद त्यांच्या दृष्टीने कधीच महत्त्वाचे नव्हते आणि केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची इच्छा त्यांनी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली होती.

दिल्लीतील प्रसिद्ध जंतर-मंतरवर 'कोक्रॉच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली नीट पेपरफुटीविरोधात झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पदाचा राजीनामा दिल्यानंतर ठीक दोन आठवड्यांनी प्रधान यांनी भुवनेश्वरमधील जीएम विद्यापीठ येथे विद्यार्थी आणि शिक्षकांना संबोधित करताना हे वक्तव्य केले. त्यांनी २५ जुलै रोजी शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

प्रधान म्हणाले, जेन झी ही आपली मुले आहेत. काही लोकांनी त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माझ्या मनात कोणताही वैयक्तिक मुद्दा नव्हता. भारतात दरवर्षी किमान दोन कोटी मुले जन्माला येतात. गेल्या दहा वर्षांत २० कोटी मुले जन्माला आली आहेत. त्यांच्या काही अपेक्षा आहेत आणि ते भारताला 'विश्वगुरू' बनवतील. मंत्रिपद माझ्यासाठी महत्त्वाचे नव्हते.'

लॉकरमधील सोनं ठरणार अर्थव्यवस्थेचं इंजिन

स्लीप मॅक्सिंगचा ट्रेंड; चांगली झोप म्हणजेच उत्तम आरोग्य?

फ्रेंच ओपन चॅम्पियनचा खेळ खल्लास!

IPL २०२७ मध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर निर्बंध?

मी शेतकऱ्याचा मुलगा, परत येईन

रायराखोल येथे झालेल्या आणखी एका कार्यक्रमात प्रधान यांनी ओडिशाचे माजी मुख्यमंत्री आणि बीजेडीचे अध्यक्ष नवीन पटनायक यांच्यावरही निशाणा साधला.

बीजेडीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे किंवा 'परत जा' अशा घोषणांमुळे आपण अजिबात विचलित झालेलो नाही, असे प्रधान यांनी सांगितले.

विमानतळाजवळ बीजेडीच्या युवक आणि विद्यार्थी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान 'धर्मेंद्र प्रधान गो बॅक' अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. त्याचा संदर्भ देताना प्रधान म्हणाले:

'मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. तुम्ही मला परत जा असे सांगितले तरी मी परत येईन.'

प्रधान यांनी पुढे सांगितले, 'नवीन बाबूही मला ओडिशाच्या जनतेसाठी कलंक आणि वाईट व्यक्ती म्हणतात.'

बीजेडी अध्यक्षांनी तरुणांना आपल्या विरोधातील आंदोलनांमध्ये सहभागी करून घेतल्याचा आरोपही प्रधान यांनी केला. ते म्हणाले, 'ओडिशाच्या जनतेला लाज वाटेल असे मी कधी काही केले आहे का?' त्यावर उपस्थितांनी मोठ्याने 'नाही' असे उत्तर दिले.

प्रधान पुढे म्हणाले, 'कदाचित मी राज्यासाठी मोठा गौरव मिळवून देत नसेन, पण माझ्या कामामुळे मी कधीही ओडिशाच्या जनतेची मान खाली घातलेली नाही. राज्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल असे कोणतेही काम मी कधीच करणार नाही.'

प्रधान म्हणाले की, भगवान जगन्नाथ आणि संबलपूरच्या आराध्य देवी माँ समलेश्वरी यांच्या आशीर्वादाने ते १२ वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री झाले. पटनायक यांच्यावर प्रधान यांनी टीका केली तेव्हा मंचावर बीजेडीचे आमदार आणि ओडिशा विधानसभेतील उपनेते प्रसन्न आचार्य हे देखील उपस्थित होते.

प्रधान म्हणाले, बीजेडीच्या आंदोलनांचा विचार करून मी प्रसन्न भाईंशी सल्लामसलत केली होती की, मी येथे जावे की नाही. प्रसन्न बाबूंनी मला येण्यास सांगितले आणि माझे स्वागत केले जाईल, असे आश्वासन दिले. त्यांची परवानगी घेऊनच मी येथे आलो.'

बीजेडीचा पलटवार

बीजेडीचे संबलपूर जिल्हाध्यक्ष आणि माजी मंत्री रोहित पुजारी यांनी प्रधान यांच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिले.

पुजारी म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सामना ज्या पद्धतीने करण्यात आला, त्यावरून प्रधान यांच्यावर टीका झाली होती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka