Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
माध्यमांच्या प्रवेशबंदीनंतर व्हाइट हाऊसकडून 'ट्रम्प टीव्ही'

माध्यमांच्या प्रवेशबंदीनंतर व्हाइट हाऊसकडून 'ट्रम्प टीव्ही'

NEWS डंका 1 month ago

२४ तासांचे प्रसारण सुरू

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 'बनावट बातम्या' प्रसारित करत असल्याचा आरोप करत सीएनएन, एमएस नाऊ आणि पॉलिटिको यांना व्हाईट हाऊसमध्ये प्रवेशबंदी घातली.

यानंतर आता व्हाइट हाऊसने स्वतःचे 'ट्रम्प टीव्ही : द एसेन्शियल्स स्टेशन' हे २४ तास सुरू राहणारे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म सुरू केले आहे. प्रशासनाच्या घोषणा, ट्रम्प यांची भाषणे आणि त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांचे चित्रण या माध्यमातून थेट उपलब्ध करून दिले जाणार आहे.

'ट्रम्प टीव्ही'ची सुरुवात सोमवारी करण्यात आली. व्हाइट हाऊसच्या यूट्यूब वाहिनीवरून हे प्रसारण सुरू करण्यात आले आहे. यात प्रशासनाच्या ताज्या घोषणा, राष्ट्राध्यक्षांची भाषणे, सार्वजनिक कार्यक्रम तसेच ट्रम्प यांच्या यापूर्वीच्या कार्यक्रमांचे चित्रण दाखवले जात आहे. व्हाइट हाऊसने समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे हे प्रसारण २४ तास सुरू राहणार असल्याचे सांगितले. त्यामध्ये प्रशासनातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच जुन्या कार्यक्रमांचाही समावेश असेल. सुरुवातीच्या प्रसारणात माउंट रशमोर येथे ट्रम्प यांनी केलेल्या भाषणासह त्यांच्या शपथविधीचे चित्रणही दाखवण्यात आले.

ट्रम्प प्रशासनाने सीएनएन, एमएस नाऊ आणि पॉलिटिको या तीन वृत्तसंस्थांच्या पत्रकारांना व्हाइट हाऊस परिसरात प्रवेश देण्यास बंदी घातली आहे. या वृत्तसंस्थांनी ट्रम्प प्रशासनाविरोधात संघीय न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पत्रकारांची प्रवेशपत्रे कोणतीही पूर्वसूचना किंवा प्रक्रिया न करता रद्द करण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. या निर्णयामुळे अमेरिकेच्या संविधानातील पत्रकारिता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचेही या वृत्तसंस्थांनी न्यायालयात म्हटले आहे.

भारत इंडो-पॅसिफिकमधील उदयोन्मुख महासत्ता!

सिम कार्डच्या गैरवापरावर ३ वर्षांचा तुरुंगवास

रणगाड्यांना मिळणार 'स्वदेशी पॉवर'! ५८६ कोटींचा करार

दसऱ्यापासून भारतीय उत्पादने न्यूझीलंडमध्ये 'शुल्कमुक्त'!

ट्रम्प यांनी या वृत्तसंस्थांवर 'खोट्या बातम्या' प्रकाशित केल्याचा आरोप केला आहे. माध्यमांना बातम्या प्रकाशित करण्याचे स्वातंत्र्य आहे; मात्र त्यांना व्हाइट हाऊसच्या परिसरात किंवा राष्ट्राध्यक्षांच्या कार्यक्रमांच्या पत्रकारांच्या समूहात प्रवेश मिळण्याचा स्वयंचलित अधिकार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर एबीसी, सीबीएस, फॉक्स, एनबीसी आणि सीएनएन या पाच प्रमुख अमेरिकी दूरचित्रवाणी वाहिन्यांनी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यक्रमांसाठी असलेले पारंपरिक व्हाइट हाऊस दूरचित्रवाणी समूहाचे वृत्तांकन स्थगित केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka