नेतन्याहूंकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर जगभरातील नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही खास शुभेच्छा दिल्या आहेत.
नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना, त्यांच्या नेतृत्वामुळे भारताचे रूपांतर जागतिक शक्तीत झाल्याचे म्हटले आहे.
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा, नरेंद्र! पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुमच्या नेतृत्वाने भारताला जागतिक शक्तीत बदलले आहे.' तसेच भारत आणि इस्रायल या दोन लोकशाही देशांमध्ये अभूतपूर्व भागीदारी उभी राहिल्याचेही त्यांनी नमूद केले. भारत-इस्रायल संबंधांवर भाष्य करताना नेतन्याहू यांनी दोन्ही देशांमधील मैत्री यापूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाल्याचे म्हटले. 'एकत्रितपणे आपण आपल्या दोन महान लोकशाही देशांमध्ये अभूतपूर्व भागीदारी उभी केली आहे. इस्रायल आणि भारतातील मैत्री यापूर्वी कधीही इतकी मजबूत नव्हती आणि आपण ती आणखी उंचीवर नेऊ,' असा संदेश त्यांनी दिला.
मोदींच्या वाढदिवशी परदेशी राजनयिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव
पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
ब्रिटनमध्ये इंग्रजी भाषण गाजल्यानंतर शिंदेंचे गुजरातीत भाषण
युपीआय चालवणे स्वस्त नाही; राहुल गांधींच्या विरोधात ओमर अब्दुल्लांची भूमिका
पंतप्रधान मोदींना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि यशासाठी शुभेच्छा देताना नेतन्याहू यांनी पुढील अनेक वर्षे त्यांचे नेतृत्व कायम राहावे, अशी सदिच्छाही व्यक्त केली मोदींच्या वाढदिवसानिमित्त विविध देशांच्या नेत्यांकडून शुभेच्छा येत असताना नेतन्याहूंच्या या संदेशात भारत-इस्रायलमधील वाढत्या द्विपक्षीय संबंधांवर विशेष भर देण्यात आला आहे. याआधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत भारत-रशिया धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यातील त्यांच्या योगदानाचे कौतुक केले होते.

