भेटीचा व्हिडिओ व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाली. विशेष म्हणजे, जिनपिंग यांच्यासोबतच पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचीही अतिशय उत्साहपूर्ण पद्धतीने भेट घेतली.
या भेटीचा एक रंजक व्हिडिओही समोर आला आहे.
पंतप्रधान मोदी, पुतिन आणि जिनपिंग यांची भेट होत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ दूर उभे राहून हे संपूर्ण दृश्य पाहत होते. खरं तर, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात सर्व सदस्य देशांच्या नेत्यांसोबत झालेल्या संयुक्त फोटोसेशनने झाली. यावेळी पुतिन आणि जिनपिंग सभागृहात पंतप्रधान मोदींच्या दिशेने आले आणि त्यांनी मोदींची अतिशय उत्साहाने हस्तांदोलन करत भेट घेतली. या वेळी शहबाज शरीफही या तिन्ही नेत्यांमधील संवाद पाहत होते. मात्र, पंतप्रधान मोदी आणि शहबाज शरीफ यांच्यात कोणतीही बातचीत झाली नाही. आता या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्याच्या व्यासपीठावरून दहशतवादाविरोधात एकजुटीचं आवाहन केलं. ते म्हणाले, 'दहशतवाद संपूर्ण मानवतेसाठी गंभीर आव्हान बनला आहे. त्याविरोधातील लढाई केवळ 'कृती आणि प्रतिक्रिया' या विचारापुरती मर्यादित ठेवता येणार नाही. दहशतवादासाठी होणारा निधी, दहशतवाद्यांची भरती, कट्टरतावाद आणि दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय देणारी संपूर्ण व्यवस्था नष्ट करावी लागेल.'
उत्तराखंडमध्ये मान्यता नसलेले मदरसे होणार बंद!
'दहशतवाद कोणासाठीही रणनीतिक साधन ठरू शकत नाही'
भारताची अर्थव्यवस्था मजबूत; 'झूठ की गूंज' मात्र सुरूच
भारतातील श्रीलंकन निर्वासितांच्या परतीचा मार्ग खुला
पंतप्रधान मोदी यांनी पुढे सांगितलं, 'शांततापूर्ण आणि सुरक्षित युरेशियासाठीची आपली सामायिक इच्छा अफगाणिस्तानातील शांतता आणि स्थैर्याशीही जोडलेली आहे. भारत अफगाणिस्तानातील जनतेच्या विकासासाठी तसेच मानवतावादी मदतीसाठी यापूर्वीही योगदान देत आला आहे आणि पुढेही देत राहील.'

