Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'नीट' विद्यार्थ्यांच्या आत्महत्या विसरून 'कॉक्रोच' नेत्यांची जंगी पार्टी

'नीट' विद्यार्थ्यांच्या आत्महत्या विसरून 'कॉक्रोच' नेत्यांची जंगी पार्टी

NEWS डंका 0 months ago

कॉक्रोच पार्टीचे सहसंस्थापक मेघनाद यांचा आरोप

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टी पुन्हा एका नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांचा आनंदोत्सव साजरा करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर केवळ राजकीय विरोधकांनीच नव्हे, तर संघटनेच्या सुरुवातीच्या सह-संस्थापकांपैकी एकानेही नेतृत्वावर गंभीर टीका केली आहे.

कॉक्रोचच्या अधिकृत एक्स हँडलवर 'राजीनाम्याचा आनंद (Resignation ki khushi) या कॅप्शनसह शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओंमध्ये पक्षाचे प्रवक्ते सौरव दास, आशुतोष रंका आणि इतर सदस्य एका आलिशान हॉटेलमध्ये नाचत व आनंद साजरा करताना दिसत आहेत. 'नीट' पेपरफुटी प्रकरणावर अनेक आठवड्यांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर हा कार्यक्रम झाल्याचे सांगितले जात आहे.

हे व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली. परीक्षेच्या वादामुळे विद्यार्थी अजूनही अनिश्चिततेत असताना अशा प्रकारे जल्लोष करणे योग्य आहे का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.

सह-संस्थापक मेघनाद एस यांची तीव्र नाराजी

या प्रकरणावर सर्वात तीव्र प्रतिक्रिया कॉक्रोचच्या सुरुवातीच्या सदस्यांपैकी एक असलेल्या आणि 'न्यूजलॉन्ड्री'शी संबंधित राहिलेल्या मेघनाद एस यांनी दिली. त्यांनी इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये कॉक्रोच पार्टीच्या नेतृत्वापासून स्वतःला दूर ठेवत गंभीर आरोप केले.

मेघनाद यांनी म्हटले की, आंदोलन यशस्वी झाल्याचा आनंद साजरा करत असताना ३७ दिवस चाललेल्या जंतर-मंतर आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक स्वयंसेवकांना त्यांच्या नशिबावर सोडण्यात आले.

अभिषेक बॅनर्जींच्या 'सेवाश्रय' शिबिरातील डॉक्टर-विद्यार्थ्यांची होणार चौकशी

'आंदोलन झाले म्हणून लाठीमार करण्याचा अधिकार नाही'

'नीट' परिक्षेत फक्त ११ गुणांनी कटऑफ हुकल्याने विद्यार्थीनीने जीवन संपवले

सोन्या-चांदीला पुन्हा झळाळी; तणाव ओसरताच दर तेजीत

त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी स्वतःच्या पैशातून आंदोलन संपल्यानंतर अडकलेल्या स्वयंसेवकांना घरी परत पाठवण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था केली. कॉक्रोचचे नेते आंदोलनस्थळ सोडताच दिल्ली पोलिसांनी परिसर रिकामा केला आणि अनेक विद्यार्थी व स्वयंसेवक अन्न, निवारा व मदतीशिवाय अडकून पडले.

मेघनाद यांनी आरोप केला की, ७० हून अधिक विद्यार्थी व आंदोलनकर्ते दिल्लीत उपाशी अवस्थेत असताना कॉक्रोचचे नेते 'राजीनामा पार्टी'मध्ये व्यस्त होते. आंदोलन यशस्वी करण्यासाठी मेहनत करणाऱ्या स्वयंसेवकांना संघटनेने सोडून दिले असून कॉक्रोच आता 'इतर राजकीय पक्षांसारखीच' बनली असल्याची टीकाही त्यांनी केली.

भाजप खासदार महेश जेठमलानी यांचाही सवाल

या व्हिडिओंवर भाजपचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनीही प्रतिक्रिया दिली. एक्सवर व्हिडिओ शेअर करत त्यांनी आंदोलनासाठी झालेल्या खर्चाबाबत प्रश्न उपस्थित केला.

'खरंच? कॉक्रोच जनता पार्टीचे नेते हॉटेलमध्ये विजयाची पार्टी करत आहेत! दिल्लीत अनेक दिवस हिंसाचार घडल्यानंतर हे तथाकथित युवा कार्यकर्ते संगीत लावून नाचत आहेत. त्यांनी पुढे विचारले की, महिनाभर चाललेल्या आंदोलनासाठी आंदोलनकर्त्यांचा प्रवास, निवास, अन्न, साहित्य आणि इतर खर्चाचा निधी नेमका कोणी पुरवला?

सोशल मीडियावर जोरदार चर्चा

हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र चर्चा सुरू झाली आहे. कॉक्रोचच्या समर्थकांनी हा कार्यक्रम आंदोलनाच्या यशाचा खासगी आनंदोत्सव असल्याचे म्हटले आहे. मात्र, टीकाकारांचे म्हणणे आहे की, या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आंदोलन केल्याच्या संघटनेच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ही बातमी लिहिली जात असताना, आंदोलन संपल्यानंतर स्वयंसेवकांना मदतीशिवाय सोडल्याच्या मेघनाद एस यांच्या आरोपांवर कॉक्रोच किंवा व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या कोणत्याही नेत्याने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka