Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
उत्तर प्रदेशसाठी भाजपचा नवा फॉर्म्युला

उत्तर प्रदेशसाठी भाजपचा नवा फॉर्म्युला

NEWS डंका 1 month ago

विनोद तावडेंनी लखनौमध्ये ठोकला तळ

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला अजून काही काळ बाकी असला, तरी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच २०२७च्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशसारख्या देशातील सर्वात मोठ्या राजकीय राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजपने संघटनात्मक पातळीवर हालचाली वेगवान केल्या आहेत.

पक्षाचे उत्तर प्रदेश प्रभारी विनोद तावडे यांनी लखनौमध्ये तळ ठोकत वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी आणि संघटनात्मक बैठकांना सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांनी आगामी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला.

भाजपच्या आगामी रणनीतीमध्ये '४सी' फॉर्म्युल्याला विशेष महत्त्व दिले जात आहे. मतदारसंघनिहाय अभ्यास, संवाद, संघटनात्मक समन्वय आणि स्थानिक राजकीय समीकरणांचा विचार या आधारावर पक्षाची पुढील वाटचाल निश्चित केली जाणार आहे. प्रत्येक मतदारसंघातील परिस्थिती समजून घेणे, स्थानिक पातळीवरील समस्या जाणून घेणे आणि त्यानुसार निवडणुकीची रणनीती तयार करणे यावर भर दिला जाणार आहे.

तेलंगणात बीआरएसच्या दोन आमदारांना अटक

जपानचा ७-० ने धुव्वा उडवत भारत उपांत्यपूर्व फेरीत

गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ

यावेळी भाजपचे विशेष लक्ष बूथ पातळीवरील संघटन मजबूत करण्यावर आहे. कमकुवत बूथ ओळखून तिथे कार्यकर्त्यांची ताकद वाढवणे, मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवणे आणि पक्षाच्या योजनांचा प्रचार घराघरात पोहोचवणे, या माध्यमातून निवडणुकीची तयारी केली जाणार आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नव्हते. त्यामुळे त्या निवडणुकीतील कमतरता आणि मतदारसंघनिहाय निकालांचा अभ्यास करून आगामी विधानसभा निवडणुकीत सुधारणा करण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जात आहे.

समाजवादी पक्षाच्या 'पीडीए' राजकारणाला उत्तर देण्यासाठी विविध समाजघटकांपर्यंत पोहोचण्याची रणनीतीही भाजप आखत आहे. महिला, युवा, शेतकरी आणि गरीबांसाठी राबवण्यात आलेल्या योजनांचा प्रचार करण्यासोबतच सरकारच्या कामगिरीचा मुद्दा जनतेसमोर मांडला जाणार आहे. त्यामुळे विनोद तावडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही मोर्चेबांधणी उत्तर प्रदेशातील आगामी राजकीय लढतीची दिशा ठरवणारी ठरणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka