Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वाइस ऍडमिरल अजय कोचर भारतीय नौदलाचे नवे उपप्रमुख

वाइस ऍडमिरल अजय कोचर भारतीय नौदलाचे नवे उपप्रमुख

NEWS डंका 3 weeks ago

INS विक्रमादित्यपासून वेस्टर्न फ्लीटपर्यंत सांभाळल्या आहेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

भारतीय नौदलात शुक्रवार (२९ मे) रोजी वाइस ऍडमिरल अजय कोचर यांनी देशाचे ४८ वे व्हाइस चीफ ऑफ नेव्हल स्टाफ (VCNS) म्हणून पदभार स्वीकारला.

नवी जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी नवी दिल्लीतील नॅशनल वॉर मेमोरियल येथे जाऊन देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली. वाइस ऍडमिरल कोचर यांनी शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी निवृत्त होत असलेले व्हाइस चीफ ऑफ नेव्हल स्टाफ वाइस अॅडमिरल संजय वात्सायन यांनीही शहीदांना अभिवादन केले.

वाइस ऍडमिरल अजय कोचर हे भारतीय नौदलातील वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्यांपैकी एक मानले जातात. पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकादमी (NDA) चे माजी विद्यार्थी असलेल्या अजय कोचर यांना १ जुलै १९८८ रोजी भारतीय नौदलात कमिशन मिळाले होते. ते गनरी आणि क्षेपणास्त्र प्रणाली तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. ३७ वर्षांहून अधिक कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या कमांड, ऑपरेशनल आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

कारकिर्दीदरम्यान त्यांनी INS नाशक, विभूती आणि किर्पाण या युद्धनौकांचे नेतृत्व केले. तसेच ते फ्रिगेट INS Trikand चे कमिशनिंग कमांडिंग ऑफिसरही होते. वाइस ऍडमिरल कोचर यांनी भारतीय नौदलाच्या प्रमुख विमानवाहू युद्धनौकेची म्हणजेच INS Vikramaditya चीही धुरा सांभाळली होती. त्यांच्या कार्यकाळात विक्रमादित्यच्या एअर विंगचे यशस्वी एकत्रीकरण आणि संचालन पूर्ण करण्यात आले.

त्यांनी Defence Services Staff College, नेव्हल वॉर कॉलेज गोवा आणि युनायटेड किंगडममधील रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीजमधून उच्च लष्करी शिक्षण घेतले आहे. नौदल मुख्यालयात त्यांनी जॉइंट डायरेक्टर नेव्हल प्लॅन्स, डायरेक्टर ऑफ स्टाफ रिक्वायरमेंट्स आणि प्रिन्सिपल डायरेक्टर DSCT यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर काम केले. २०१८ मध्ये फ्लॅग रँकवर पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांनी एअरक्राफ्ट कॅरिअर प्रकल्प तसेच युद्धनौका बांधणी आणि खरेदीशी संबंधित महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यानंतर २०२१ मध्ये त्यांनी वेस्टर्न फ्लीटचे नेतृत्व स्वीकारले.

कॉकरोच जनता पार्टीच्या एक्स खात्यावरील बंदी कायम!

संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेत बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांना मेडल

वादळी पावसामुळे बेतवा नदीवरील बांधकामाधीन पूल कोसळला; ६ मजुरांचा मृत्यू

पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये हातभट्टीच्या विषारी दारुने १३ दगावले

२५ मे २०२४ रोजी त्यांनी वेस्टर्न नेव्हल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ पद स्वीकारले. त्या काळात पश्चिम किनारपट्टीवरील सुरक्षा आव्हाने मोठ्या प्रमाणात वाढली होती. पारंपरिक आणि अपारंपरिक धोक्यांचा सामना करण्यासाठी नौदलाच्या रणनीतिक तयारीचे नेतृत्व त्यांनी केले. ऑपरेशन सिंदूरदरम्यान वेगाने राबवण्यात आलेल्या नौदल मोहिमांमध्येही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. उत्कृष्ट सेवा आणि नेतृत्वक्षमतेबद्दल त्यांना २०२२ मध्ये अति विशिष्ट सेवा मेडल (AVSM) आणि २०२६ मध्ये परम विशिष्ट सेवा मेडल (PVSM) प्रदान करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka