Dailyhunt
16 नातवंडे असणाऱ्या 70 वर्षीय आजोबांनी केले दुसरे लग्न अन्.

16 नातवंडे असणाऱ्या 70 वर्षीय आजोबांनी केले दुसरे लग्न अन्.

खनौ (उत्तर प्रदेश) : 16 नातवंडे असणाऱ्या 70 वर्षीय आजोबांनी एकटेपणाला कंटाळून दुसरे लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, दुसऱ्या लग्नानंतर महिलेने घरातील पैसे आणि लाखो रुपयांचे दागिने घेऊन पळ काढल्यामुळे आजोबांवर पस्तावण्याची वेळ आली आहे.

वृद्ध नवरदेवाने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली आणि पत्नीला शोधण्याची विनंती केली. आजोबांनी सांगितले की, ‘पत्नीने आजपर्यंतची आपली सर्व बचत घेऊन पळून गेली आहे. पत्नी सापडली नाही तर रस्त्यावर येण्याची वेळ येईल. कारण आता घराशिवाय दुसरं काहीच जवळ राहिलेले नाही.’ दरम्यान, या घटनेमुळे परिसरात चर्चांना उधाण आले असून, पोलिस महिलेचा शोध घेत आहेत.

अमरोहाच्या राहरा पोलिस स्टेशन हद्दीतील गंगवार गावात राहणाऱ्या 16 नातवंडे असणाऱ्या 70 वर्षीय सुबरातीची पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी सुबराती यांच्या मनात लग्नाची इच्छा जागृत झाली. यावेळी शेजारी गावात राहणाऱ्या एका युवकाने त्यांना गावातील एका 50 वर्षीय विधवा महिलेची माहिती दिली. संबंधित महिलेला तीन मुले आहेत. पण, संबंधित महिला लग्नासाठी तयार असल्याचे सांगितले. युवकाने दोघांची भेट घडवून आणली होती.

दोन वर्षांपूर्वी वृद्धाने त्या महिलेसोबत कोर्ट मॅरेज केले होते. दोघांनी आयुष्यभर एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली. महिलेला जवळपास पाच लाख रूपये दिले. शिवाय, पहिल्या पत्नीचे दागिनेही दिले. मात्र, लग्नानंतर महिलेने घरातील रोख रक्कम आणि लाखो रुपयांचे दागिने घेऊन पळ काढला आहे.

जावई म्हणतो सासूला; मला तुझ्याशीच लग्न करायचेय…

IPS महिला अधिकाऱ्याची फसवणूक; लग्नानंतर खरी माहिती उघड…

पत्नी पाचव्यांदा लग्न करत समजल्यावर चौथ्या पतीने उचलले मोठे पाऊल…

धक्कादायक! लग्नानंतर नवरीने पाचव्या दिवशीच दाखवला खरा चेहरा…

राजाबाबू! डॉक्टर तर कधी अधिकारी सांगून 6 महिलांशी केली लग्न अन्…

70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षांच्या सुनेसोबत केलं लग्न…

The post 16 नातवंडे असणाऱ्या 70 वर्षीय आजोबांनी केले दुसरे लग्न अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka