Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आयपीएस सत्यसाई कार्तीक यांची अमलीपदार्थ विकणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई.

आयपीएस सत्यसाई कार्तीक यांची अमलीपदार्थ विकणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई.

पुणे (संदिप कद्रे): लोणावळा उपविभागाचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत अमलीपदार्थ विकणाऱ्या ड्रग्ज पेडलरांविरोधात दणकेबाज कारवाई केली आहे. दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये साडेतीन लाखांच्या एम.डी पावडरसह एकूण बारा लाखांचा मुद्देमाल जप्त तर चार जणांना जेरबंद केले आहे.

लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळा विभागात अमली पदार्थांची चोरून विक्री होत असुन त्यामुळे परिसरातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याची माहिती श्री. कार्तिक यांना मिळाली होती. त्यासाठी सत्यासाई कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेऊन त्याअंतर्गत परिसरातील युवकांमध्ये जनजागृती करणे, तसेच अमली पदार्थांचे सेवन, साठवणुक व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. संकल्प नशामुक्ती अभियानाचाच एक भाग म्हणून सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अमलीपदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात गेल्या काही दिवसात कठोर कारवाया करून अनेक आरोपींना जेरबंद करून त्यांचेकडून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ हस्तगत केले आहेत.

दिनांक 09/06/2024 रोजी सत्यसाई कार्तीक यांनी त्यांचे पथकासह टाकलेल्या छाप्यात कामशेत पो.स्टे हद्दीतील गगन न्यू लाईफ सोसायटी समोर, रमेश शिंदे यांचे चाळीत 1)दिनेश दीपक शिंदे, वय 24 वर्ष, राहणार कामशेत, तालुका मावळ, जिल्हा पुणे व 2) सौरभ राजेश शिनगारे, वय 24 वर्ष, राहणार कामशेत, तालुका मावळ जिल्हा पुणे यांना ताब्यात घेऊन पंचांसमक्ष त्यांची झाडाझडती घेतली असता त्या दोघांचे ताब्यातून वेगवेगळ्या वजनाचे एकूण 32 ग्रॅम एमडी पावडर हा अमलीपदार्थ व त्याची पॅकिंग करून विक्री करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पॅकींगच्या प्लास्टिकच्या पिशव्या असा एकूण 3,20,146/- रू. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पो कॉ अमोल ननवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 चे विविध कलमान्वये कामशेत पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद कण्यात आला आहे तसेच पुढील तपास कामशेत पो.स्टे चे पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहेत.


पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष 'सन्मान योजना'

दिनांक 16/06/2024 रोजी श्री. कार्तिक यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सकाळी 06.20 वाजताचे सुमारास 1)शिवाजी मारुती कडू, वय 35 वर्ष, राहणार कुरवंडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे व 2) दिलीप बबन पिंगळे, वय 29 वर्षे, राहणार कुनेगाव, तालुका मावळ, जिल्हा पुणे हे त्यांचे ताब्यातील मारुती सुझुकी ब्रेझ्झा गाडीतून लोणावळा दिशेकडे जात असताना लोणावळा पो.स्टे हद्दीतील रायगड ते कुरवडे रोडवर, ड्रीमलँड बंगल्यासमोर श्री सत्यसाई कार्तिक यांनी पथकासह त्यांना थांबवून, पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्या दोघांचे ताब्यातून वेगवेगळ्या वजनाचे सुमारे 44000/- रू किमतीचे एकूण 04.40 ग्रॅम एम.डी पावडर मिळून आले आहे. सदरचे एम.डी पावडर हे चारचाकी गाडीतून विक्रीकरिता घेऊन जात असल्याचे नमूद इसमांकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्याने त्यांचेकडून चार चाकी वाहनासह एकूण 8,94,000/- रू. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरबाबत पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा पो स्टे येथे एन.डी.पी.एस ॲक्ट, 1985 चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा पो.स्टे चे सपोनि लाड हे करत आहेत.

संकल्प नाशामुक्ती अभियानांतर्गत केलेल्या सदरच्या दोन्ही कारवायांमध्ये सुमारे 3,60,000/- रू. किमतीच्या एकूण 36.60 ग्रॅम एम.डी पावडरसह रू.12,14,146/- (अक्षरी – बारा लाख चौदा हजार एकशे सेहचाळीस रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन दोन्ही गुन्ह्यांमध्ये पोलिस यंत्रणा सखोल तपास करत आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, पो.हवा अंकुश नायकुडे, पो.ना दत्ता शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे, पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ अमोल ननवरे, पो.कॉ अंकुश पवार, पो.कॉ गणेश ठाकूर, पो.कॉ प्रतीक काळे , पो.कॉ महेश थोरात, पो.कॉ सौरभ साबळे, पो.कॉ यश माळवे यांचे पथकाने केली आहे.

Video: लोणावळा येथे अश्लिल चित्रफीत तयार करणा-या टोळीवर कारवाई; पाहा नावे…

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी एकाला पाठलाग करून पकडले अन्…

लोणावळा पोलिसांनी कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा केला जप्त…

लोणावळा येथे सत्यसाई कार्तिक यांच्या धडाकेबाज कारवाया सुरूच…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post आयपीएस सत्यसाई कार्तीक यांची अमलीपदार्थ विकणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka