Dailyhunt
अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या चालकाला अपघात प्रकरणी केली अटक.

अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या चालकाला अपघात प्रकरणी केली अटक.

मुंबईः प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या मोटारीने कांदिवलीमधील पोईसर मेट्रो स्थानकाजवळ काही दिवसांपूर्वी दोन मजुरांना उडवले होते. यावेळी एका मजुराचा जागीच मृत्यू झाला असून एक मजूर गंभीर जखमी झाला आहे.

अपघातादरम्यान उर्मिला आणि गाडीचा चालक जखमी झाला होता. उर्मिला कोठारे हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्मिलाच्या गाडीच्या चालकाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्मिला कोठारे हिच्या गाडीचा अपघात शुक्रवारी मध्यरात्री 12.54 च्या सुमारास झाला. उर्मिला आपल्या मैत्रिणीला भेटून घरी परतत होती, त्यावेळी हा अपघात झाला. यापूर्वी गाडीत मागे सीटवर बसलेल्या मैत्रिणीला उर्मिला हिने जोगेश्वरीला सोडले. त्यानंतर ठाणे-घोडबंदर मार्गाने ती घरी जात होती. त्याचवेळी उर्मिलाची गाडी कांदिवली पोईसर मेट्रो स्थानकाजवळ पोहोचली आणि चालक गजानन पाल याचे गाडीवरचं नियंत्रण सुटले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील म्हणाले, ‘चालक आणि अभिनेत्रीने चौकशीदरम्यान सांगितले की, एका वाहन चालकाने भरधाव वेगात येऊन त्यांच्या गाडीला ओव्हरटेक केले. त्यामुळे त्या गाडीला धडकू नये म्हणून उर्मिलाचा चालक प्रयत्न करत असतानाच गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी उलटली. त्यानंतर गाडी एका बॅरिकेडला आदळली. त्यामुळे पुढे जाऊन गाडीने मेट्रो स्थानकाजवळ काम करणाऱ्या दोन मजुरांना उडवले. यात सम्राटदास जितेंद्र नावाच्या मजुराचा मृत्यू झाला, तर सुजन रविदास जखमी झाला.’

दरम्यान, अपघात प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याशिवाय अपघातग्रस्त गाडी जप्त केली आहे. अपघाताच्या वेळी चालक दारू पिऊन गाडी चालवत होता की नाही? याचा तपास करण्यासाठी रक्ताचे नमुने घेतले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याला कोठडी…

पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री अडचणीत; ईडीकडून सात तास चौकशी…

अभिनेत्री नरगिस फाखरी हिच्या बहिणीला अटक; प्रियकराला जिवंत जाळलं…

प्रेम प्रकरण! अभिनेत्रीला पोलिसांनी घेतले ताब्यात…

बॉलीवूड अभिनेत्री पहिल्याच प्रयत्नात बनली IPS अधिकारी…

The post अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या चालकाला अपघात प्रकरणी केली अटक… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka