हैद्राबाद: साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याला आज (शुक्रवार) अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
हैद्राबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 चित्रपटाचा प्रीमिअर शो आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अल्लू अर्जुनने पोलिस प्रशासनाला माहिती न देता उपस्थित लावली. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी झाली. अचानक झालेल्या गर्दीचे व्यवस्थापन त्या चित्रपट व्यवस्थापकांना करता आले नाही. परिणामी त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. 4 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर त्या महिलेच्या कुटुंबीयांनी अल्लू अर्जुन आणि संध्या थिएरट मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पुष्पा फेम अल्लू अर्जुनला पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन अटक केली. त्यानंतर त्याला हैद्राबादच्या गांधी रुग्णालयात मेडिकल टेस्टसाठी हजर करण्यात आले. स्टारडम असलेल्या अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी तिथेही गर्दी झाली होती. अल्लू अर्जुनला पाहून त्यावेळीही चाहत्यांनी आरडाओरड सुरू केली. एका सर्वसामान्य आरोपीप्रमाणे अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली. तसेच त्याला शासकीय रुग्णालयातही मेडिकल टेस्टसाठी नेण्यात आले. अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता त्याच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, पुष्पा 2 च्या प्रीमियरसाठी अल्लू अर्जुनने उपस्थितीबद्दल आगाऊ माहिती न दिल्याचा आरोप करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर संध्या थिएटरवर सुरक्षेबाबत निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर अल्लू अर्जुनने मृत महिला आणि तिच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत 25 लाख रुपयांची मदत केली. तसेच दुःख व्यक्त करणारा व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला होता.
पुष्पा 2! सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याला अटक…
पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री अडचणीत; ईडीकडून सात तास चौकशी…
अभिनेत्री नरगिस फाखरी हिच्या बहिणीला अटक; प्रियकराला जिवंत जाळलं…
प्रसिद्ध अभिनेत्रीची घरात गळफास घेऊन आत्महत्या…
बॉलीवूड अभिनेत्री पहिल्याच प्रयत्नात बनली IPS अधिकारी…
अभिनेता सलमान खान याची सुपारी घेणाऱ्याला पानिपतमधून केली अटक…
The post साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याला कोठडी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

