Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने घेतला घटस्फोटाचा निर्णय.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने घेतला घटस्फोटाचा निर्णय.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने घटस्फोट घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. याबाबत उर्मिला हिने सध्या मौन बाळगले असून, कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

उर्मिला मातोंडकर हिने लग्नाच्या 8 वर्षानंतर पती मोहसिन अख्तर मीरपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

हा निर्णय सहमतीने घेण्यात आला नाही, असेही सांगितले जात आहे. मात्र पूर्ण विचार करुन उर्मिलाने हा निर्णय घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. उर्मिलाने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. घटस्फोटामागचे कारण अद्याप समोर आले नाही. घटस्फोटाबाबत अजून उर्मिलाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उर्मिला आणि मोहसीन गेल्या काही काळापासून वेगळे राहात आहेत. उर्मिलाने 3 मार्च 2016 मध्ये मोहसिन अख्तर मीरशी लग्न केले. या दोघांची भेट डिझायनर मनीष मल्होत्रामुळे झाली. मनीष हा दोघांचा कॉमन फ्रेंड आहे. आता 8 वर्षांनंतर अर्ध्यावर संसाराचा डाव मोडून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे.

उर्मिलाने तिच्यापेक्षा 10 वर्ष लहान असणारा मॉडेल काश्मिरी मॉडेल आणि व्यावसायिक मोहसिन अख्तरशी लग्न केले होते. या लग्नाची खूप चर्चा झाली होती. तर लग्नानंतर तिच्यावर टीका देखील करण्यात आली होती. या लग्नामुळे उर्मिलाला ट्रोल करण्यात आले होते. आता 8 वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा रंगल्याने पुन्हा एकदा उर्मिला सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

अभिनेत्री प्रकरण! तीन IPS अधिकाऱ्यांचे निलंबन…

अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांची आत्महत्या…

अभिनेत्रीचा लैंगिक छळ प्रकरणी दोन अभिनेत्यांविरोधात गुन्हा दाखल…

अभिनेते अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये चोरी करणारा गजाआड…

अभिनेत्री रविना टंडन हिने नशेत केली धक्काबुक्की? पोलिसांनी सांगितले…

The post अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने घेतला घटस्फोटाचा निर्णय… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka