Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अहमदनगर जिल्ह्यात निवृत्त पोलिसकाकाचा मृत्यू; महिला ताब्यात.

अहमदनगर जिल्ह्यात निवृत्त पोलिसकाकाचा मृत्यू; महिला ताब्यात.

हमदनगर: नगर-मनमाड मार्गावर शिंगणापूर फाटा येथे गुरुवारी (ता. २२) दुपारच्या सुमारास एका सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सुखदेव किसनराव गर्जे (वय ६८, रा. अकोले, जिल्हा, अहमदनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

शिंगणापूर फाटा येथे गुरुवारी दुपारी तीनच्या दरम्यान एक महिला व एक युवक सुखदेव किसनराव गर्जे यांच्याबरोबर होते अशी चर्चा आहे. याचवेळी सखदेव गर्जे खाली पडले. त्यांना तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी हवालदार बाबासाहेब शेळके, प्रवीण बागुल, सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, आजिनाथ पाखरे, राजेंद्र नागरगोजे, महिला पोलिस कर्मचारी कुसळकर आदींचे पथक ग्रामीण रुग्णालयात पाठवले. पोलिस पथकाने एक महिला व तिच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, गर्जे यांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला, हे वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच समजेल, असे राहुरी पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. गर्जे यांचा मृत्यू मारहाण केल्यामुळे झाला की अन्य कारणामुळे, याचा तपास राहुरी पोलिस करीत आहेत.

Video: 'खैके पान बनारस वाला' या गीतावर नाचणारे पोलिस कर्मचारी निलंबीत…

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

पोलिसकाकाने नातेवाईक महिलेसमोर झालेल्या मारहाणीमुळे केली आत्महत्या…

पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत लिहिले की…

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष 'सन्मान योजना'

पोलिसकाका, पुणे पोलिस आयुक्तांची तत्परता! हरवलेली मुलगी सापडली रांजणगावात…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka