Dailyhunt
अपहरण! मी तुझ्या पतीला उचललं असून, दोन कोटी तयार ठेवा.

अपहरण! मी तुझ्या पतीला उचललं असून, दोन कोटी तयार ठेवा.

पुणे: दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी एका हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

तिथल राजेंद्र शाह (वय ३५) असे अपहरण झालेल्या हिरे व्यापाऱ्याचे नाव आहे.

ते पुणे सातारा रोडवर बिबवेवाडी परिसरातील मुद्रा सोसायटीत वास्तव्याला असतात. सोमवारी (ता. ३) सायंकाळी काही अज्ञात व्यक्तींनी शाह यांचे अपहरण केले आहे. तिथल शाह हे आपल्या पत्नीसह मुलीला शाळेतून घरी आणण्यासाठी सॅलिस्बरी पार्क परिसरात गेले होते. मुलीला शाळेतून घेतल्यानंतर त्यांनी मुलीला पत्नीच्या ताब्यात दिले आणि काही कामानिमित्त पुणे कॅम्प परिसरात गेले.

फिर्यादीच्या फोनवर एका अज्ञात व्यक्तीने सायंकाळी सहाच्या सुमारास कॉल केला. मी तुझ्या पतीला उचललं आहे. दोन कोटी तयार ठेवा. तुझ्या सासऱ्यांना सांग दोन तासांत फोन करतो, अशी धमकी फोनवरील व्यक्तीने दिली आणि फोन कट केला. या घडलेल्या प्रकारानंतर तिथल शाह यांच्या पत्नीने त्यांच्या मोबाईलवर फोन करण्याचा प्रयत्न केला. पण फोन लागला नाही. यानंतर त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. घटनेची माहिती अप्पर आयुक्त मनोज कुमार यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी रवाना झाले आणि तपासाची चक्र फिरवली आहेत.

तिथल शाह यांचे शेवटचं लोकेशन नवले ब्रीज परिसरात आढळून आले आहे. शिवाय पोलिसांनी शाह यांची दुचाकी देखील याच परिसरात आढळून आली आहे. पोलिस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे तपास करत आहेत.

प्रेमविवाह करणाऱ्या युवकाचे सासऱ्याने केले अपहरण; सिनेस्टाईल सुटका…

राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरण प्रकरणात ट्विस्ट…

थरारक! चिमुकल्याची अपहरणानंतर सुटका; पोलिसांनी शेतातून काढली आरोपींची वरात…

संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ…

पुणे शहरात आईच्या डोळ्यादेखत मुलीचे एकतर्फी प्रेमातून अपहरण…

The post अपहरण! मी तुझ्या पतीला उचललं असून, दोन कोटी तयार ठेवा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka