कोल्हापूर : आंतरजातीय विवाह केला म्हणून युवकाचे अपहरण करून मारण्याचा कट कोल्हापूर पोलिसांनी उधळून लावला आहे. इन्स्टाग्रामवर ओळख होऊन मुलगा आणि मुलीने प्रेम विवाह केला होता. कोल्हापुरातून अपहरण झालेल्या युवकाची सांगलीमधून पोलिसांनी सिनेस्टाईल सुटका केली आहे.
विशाल अडसूळ (वय २६) असे या अपहरण झालेल्या युवकाचे नाव आहे.
मुलीच्या वडिलांनीच जावयाला सांगलीमधल्या घरात अर्ध नग्न अवस्थेमध्ये दोन दिवस कोंडून ठेवत मारहाण केली होती. पोलिसांनी बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून युवकाची सुटका केली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
विशाल अडसूळ याला रस्ता दाखवण्याच्या बहाण्याने 9 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 9 वाजून 15 मिनिटांच्या दरम्यान अर्टिगा गाडीतून तीन युवकांनी सोबत घेतले. मुलगा सापडत नसल्यामुळे विशालच्या वडिलांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यानंतर विशालला शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं तयार करण्यात आली होती. विशाल अडसूळ याचा प्रेम विवाह झाला असून, त्याच्या सासऱ्यांनीच विशालचे अपहरण केले आहे, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांच्या पथकाने विशालचे सासरे राहत असलेल्या मिरज सांगलीमधल्या कुपवाडमध्ये सापळा रचला, यात पोलिसांनी सासरे श्रीकृष्ण कोकरे यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी आणखी चौकशी केली असता सासऱ्यांनी विशालला वेदस अपार्टमेंट मिरज सांगलीमध्ये कोंडून ठेवल्याचं कबूल केले. सासऱ्यांच्या सांगण्यावरून पोलिस वेदस अपार्टमेंटमध्ये गेले. पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, तेव्हा त्यांना विशाल अत्यंत जखमी आणि हात बांधलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. यानंतर पोलिसांनी जखमी विशालला रुग्णालयात पाठवले. विशालवर सध्या उपचार सुरू आहेत. श्रीकृष्ण कोकरेसह त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर उरलेल्या चार साथीदारांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र करमळकर यांनी दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
प्रेम प्रकरण! पुणे शहरातील पोलिसकाकाच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल…
प्रेमी युगलाने रेल्वेसमोर उडी मारून घेतला जगाचा निरोप…
डॉक्टरचे मेहुणीसोबत जुळले प्रेमसंबंध अन् रात्रीच्या सुमारास नको ते घडलं…
प्रेमविवाहानंतर चार महिन्यातच पत्नी गेली दुसऱ्यासोबत पळून; मेसेज वाचून कोसळलाच…
'प्रेमात माझी वाट लागली', स्टेटस ठेवलं अन् घेतला जगाचा निरोप…
The post प्रेमविवाह करणाऱ्या युवकाचे सासऱ्याने केले अपहरण; सिनेस्टाईल सुटका… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

