Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी पोस्ट पाहा.

बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी पोस्ट पाहा.

मुंबईः बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित संस्था ही बदलापूरमधील नामांकित शाळा आहे.

येथील एका सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केले आहेत.

संबंधितप्रकार उघडकीस आल्यानंतर पालक आणि बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतापले आहेत. बुधवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. पीडितेपैकी एका लहान मुलीने आपल्या पालकांना लघवीच्या जागी दुखत असल्याचे सांगितले आणि हा प्रकार उघडकीस आला. हा संपूर्ण प्रकार अंगावर काटा आणणारा आहे. यासंदर्भात ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी जयेश वाणी यांनी लिहलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये जयेश वाणी हा संपूर्ण प्रकार कसा उघडकीस आला, याबद्दल सांगितले आहे.

जयेश वाणी यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटले आहे, ते पुढीलप्रमाणे…
"ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत…." हे वाक्य एका 3 वर्षे 8 महिन्याच्या मुलीचं… आईने दवाखान्यात नेल्यावर कळालं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या "दादा" ने चिमुरडीच्या अजाणतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलं. बदलापुरच्या या शाळेचं नाव आदर्श विद्यालय. शाळेचे ट्रस्टी अर्थातच obviously भ्र.ज.पा. चे पदाधिकारी नेते. आरोपी हा हिस्ट्री शिटर असल्याची माहिती मिळतेय मग तरीही त्याला संस्थेवर का ठेवलं कामाला? तो पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणुन? घटनेत एकच नाही तर जास्त मुली पिडीत आहेत. आरोपीचा हिंस्त्रपणा इतका भयानक की पिडीत चिमुरडीच्या आतड्यांपर्यंत दुखापत झाली. इतकी जुनी आणि कधीकाळी राम पातकरांसारख्या ज्येष्ठ भाजप नेत्याने अध्यक्षपद भुषवलेली संस्था असुनही संस्थेत साधे CCTV काम करत नाहीत? संबंधीत मुलीचं मेडीकल पालकांनी करून घेतलं, शाळेने तक्रार मिळूनही तोंड बंद ठेवलं होतं. हा काय प्रकार आहे? माणुसपणाची लाज वाटायला हवी. निघृण, पाशवी आणि अमानवी… बाकीही अनेक डिटेल्स आहेतच. माझ्या चिमुरड्या बाहूलीच्या नातेवाईकांनी परवानगी दिली तर त्यांच्या बाजुने सगळा कायदेशिर भाग आम्ही निःशुल्क बघुत आणि हवी ती कायदेशीर मदत मिळवून देऊत. पोलिसांनाही विनंती, लपवाछपवी बंद करा. पत्रकारांना, सामाजिक कार्यकर्त्यांना प्रकरणाची माहिती द्या.

आळंदीमध्ये वारकरी संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मुलावर महाराजाकडून बलात्कार…

संतापजनक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या चिमुकलीचा घोटला गळा अन्…

धक्कादायक! महाराष्ट्रातील चिमुकलीवर पंरप्रांतीय व्यक्तीने केला बलात्कार…

जळगाव जिल्ह्यात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; जमाव संतप्त…

बीड हादरलं! चिमुकलीवर पडक्या रूममध्ये सामूहिक बलात्कार…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka