Dailyhunt
बारामतीत बैलावरून वाद! गोळीबारातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू.

बारामतीत बैलावरून वाद! गोळीबारातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू.

बारामती : बारामती तालुक्यात शर्यतीचा बैल खरेदीकरण्याच्या वादातून निंबुत येथे गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू होती. मात्र, उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि त्यांचा मुलगा गौरव काकडे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

बारामतीच्या निंबुत गावात गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी गौतम काकडे आणि रणजित निंबाळकर यांच्यात शर्यतीच्या बैलाचा व्यवहार झाला होता. वर्ष उलटून गेले तरीदेखील व्यवहार पूर्ण झाला नसल्याने बैल परत आणण्यासाठी निंबाळकर गेले होते. त्यावेळी वाद झाला आणि याच वादातून त्यांच्यावर गोळीबार झाला. गोळीबारात रणजित निंबाळकर गंभीर जखमी झाले होते. गुरुवारी रात्री उशीरा गोळीबार झाला. उपचारादरम्यान रणजित निंबाळकर यांचा मृत्यू झाला.

गोळीबाराच्या घटनेनंतर अंकिता रणजीत निंबाळकर यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये गौतम शहाजी काकडे, गौरव शहाजी काकडे आणि तीन अनोळखी व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फिर्यादीनुसार एक वर्षांपूर्वी सर्जा हा बैल निंबुत येथील गौतम काकडे यांच्याकडून 61 लाख रुपयांना रणजित निंबाळकर यांनी विकत घेतला होता. त्यानंतर 24 जून 2024 रोजी रणजीत निंबाळकर यांच्याकडील सुंदर नावाचा बैल गौतम शहाजी काकडे यांनी 37 लाख रुपयांना विकत घेतला. यावेळी गौतम काकडे यांनी विसारापोटी पाच लाख रुपये दिले होते.

उर्वरित 32 लाख रुपये येणं बाकी होते. दरम्यान, व्यवहार झाला, त्याच दिवशी गौतम काकडे यांनी सुंदर हा बैल खटाव तालुक्यातील बुध येथून त्यांच्या घरी निंबुतला नेला. उर्वरित पैसे आणण्यासाठी गेले असताना त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यावरून रणजीत निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या संदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत.

बारामतीमध्ये कोयता हल्ल्यात कॉलेज युवकाची हत्या…

बारामतीमध्ये चोरी करण्यासाठी आरोपींनी चक्क ज्योतिषाकडून काढला होता मुहूर्त पण…

पुणे शहरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केला गोळीबार…

धक्कादायक! आरोपी निघाला पीडित युवतीचा सख्खा मावस भाऊ…

पुणे जिल्हा हादरला! विवाहितेचे हातपाय बांधून शेततळ्यात बुडवलं…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post बारामतीत बैलावरून वाद! गोळीबारातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka