Dailyhunt
बारामतीमध्ये कोयता हल्ल्यात कॉलेज युवकाची हत्या.

बारामतीमध्ये कोयता हल्ल्यात कॉलेज युवकाची हत्या.

पुणे : बारामतीमध्ये कोयता, सत्तूराचे वार करीत कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कारखेल येथील विनोद भोसले या युवकाचा या घटनेत मृत्यू झाला आहे.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

कॉलेजमधून घरी कारखेलला निघालेल्या युवकावर चार ते पाच जणांनी हल्ला केला. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झालेल्या विनोद याचा मृत्यू झाला आहे. उंडवडीच्या बसस्थानकावर उतरलेल्या विनोद यास कारखेलमधीलच चार ते पाच जणांनी कोयता आणि कुऱ्हाडीने अनामुष वार करून गंभीर जखमी केले आहे.

गावातील एका महापुरूषांच्या जयंतीच्या वेळी झालेल्या वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्यासोबत आणखीही अनेक कारणं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच बारामतीत चायनीज खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी आलेल्या अनिकेत धोत्रे या युवकावर काठी, लोखंडी रॉडने सहा जणांनी हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, त्यास काही दिवस उलटत नाहीत, तोच आता उंडवडी सुपे परिसरात ही घटना घडली आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता हल्ल्यांच्या घटनेत वाढ झाली आहे. ही दहशत रोखण्याचे प्रयत्न पुणे पोलिसांकडून सातत्याने सुरु आहेत. मात्र तरीही प्रकार संपत नसल्याचे समोर येत आहे. या टवाळ गुन्हेगारांना रोखण्यासाठी रोज नव्या शक्कल लढवत आहेत. अल्पवयीन गुन्हेगार असेल तर त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

पोलिसकाका, पुणे पोलिस आयुक्तांची तत्परता! हरवलेली मुलगी सापडली रांजणगावात…

पुणे शहरात काडीपेटी मागितली म्हणून केला गोळीबार…

पुणे पोलिस आयुक्तांनी गुन्हेगारांना दिली तंबी…

पुणे हादरले! गरोदर प्रेयसीवर चाकूने सपासप वार अन् पुढे…

पुणे जिल्ह्यात लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या; कारण सांगितले…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post बारामतीमध्ये कोयता हल्ल्यात कॉलेज युवकाची हत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka