Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भरदिवसा चौकात रस्त्याकडेलाच बलात्कार; Video Viral.

भरदिवसा चौकात रस्त्याकडेलाच बलात्कार; Video Viral.

भोपाळ (मध्य प्रदेश): उज्जैनमध्ये एका महिलेवर भरदिवसा रस्त्याकडेला बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने महिलेला दारू पाजली, त्यानंतर लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी संबंध ठेवले.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पीडित महिलेने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, ‘लोकेश या युवकाने लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर दारू पाजून रस्त्याकडेलाच शरीरसंबंध ठेवले. यानंतर तो तिथून पळून गेला.’ धक्कादायक म्हणजे उज्जैन मधील गजबजलेल्या चौकात ही घटना घडली. नागरिकांनी याचे व्हिडीओ शूट करून, व्हायरल केले.

घटनेनंतर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले आहे. उज्जैन मध्यप्रदेश काँग्रेस कमिटीने या घटनेवरून सरकारवर टीका केली. महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसने म्हटलं की, धार्मिक शहर उज्जैनची मान या घटनेमुळे खाली गेली आहे. राज्यातली कायदा सुव्यवस्था फेल झाली आहे.

मोठी बातमी! बलात्काऱ्यांना 10 दिवसांत फाशी; विधानसभेत विधेयक मंजूर…

मुंबईत मैत्रीच्या ओळखीचा गैरफायदा! सामूहिक बलात्कार…

बलात्कार पीडितेचे नाव, फोटो शेअर केल्यास शिक्षा…

डॉक्टर बलात्कार आणि हत्या! पोलिसांच्या तीक्ष्ण नजर अन् आरोपीचे फुटलं बिंग…

सोलापूर हादरलं! मित्राचे दीड महिन्यांपूर्वी निधन अन् त्याच्या पत्नीवर बलात्कार…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka