Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बीडमध्ये अमानुष मारहाण! 'खोक्या' आला समोर अन् सांगितलं.

बीडमध्ये अमानुष मारहाण! 'खोक्या' आला समोर अन् सांगितलं.

बीड : बीडमध्ये एका व्यक्तीला अमानुषपण मारहाण केल्याच व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. संबंधित व्हिडीओ भाजपचा भटक्या विमुक्त आघाडीचा प्रदेश पातळीवरील पदाधिकारी सतीश भोसले याचा असल्याचे उघड झाले आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भोसले समोर आला असून हा व्हिडीओ अडीच वर्ष जुना आहे. छेडछाडीच्या कारणातून मारहाण केली होती, असे स्पष्टीकरण भोसले याने दिले आहे.

भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले याने बीडमध्ये एका व्यक्तीला अमानुषपणे मारहाण केलेला एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसले समोर आला असून, सांगितले की, ‘संबंधित व्हिडीओ चुकीचा असून तो दोन वर्षांपूर्वीचा आहे. माझ्या मित्राच्या कुटुंबातील महिलेची छेड काढल्याने मी त्या ठिकाणी गेलो होतो. मला राग अनावर झाला नाही, त्यामुळे मी त्याला मारहाण केली. महिलेच्या सांगण्यावरून मी त्याला तिथे मारहाण केली होती. त्या व्यक्तीने माझ्या मित्रांची दहा लाखाला फसवणूक केली आहे. संबंधित पीडित व्यक्ती हा तो व्यवहार मिटवण्यासाठी मित्राच्या घरी आला होता. मात्र, त्याने त्याच्या पत्नीची छेड काढली होती. त्यामुळे हे मला ऐकून राग आला, त्यानंतर मी त्याला मारहाण केली होती. मला तेव्हा पोलीस स्टेशनला जाण्यासाठी वेळ मिळाला नव्हता. मी एक छोटा कार्यकर्ता असून, पारधी समाजातून आलो आहे. माझा समाज हा दुर्मीळ आहे. पण हा व्हिडीओ पूर्ण चुकीचा आहे. त्याची सत्यता पाहा. इतर विषय झाकण्यासाठी हे केले जात आहे. माझी विनंती मी त्याला मारहाण केली असून, मी चुकलो आहे, त्या चुकीबद्दल मी माफी मागतो.’

दरम्यान, मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव राधेश्याम भोसले आहे. कौटुंबिक वादातून सतीश भोसलेकडून अमानुष मारहाण केली होती. सतीश भोसले (उर्फ खोक्या, पार्टी) हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. पण या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र मारहाण करत असताना अत्यंत अमानुष पद्धतीने तळपायावर बॅटच्या साह्याने मारले जात आहे. विशेष या व्यक्तीचे कपडे काढून मारहाण केली होती. हे अत्यंत धक्कादायक असून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो पाहून युवकाने केली आत्महत्या…

वाल्मिक कराड याचा आयफोन मधील डेटा रिकव्हर करताच सत्य आलं समोर…

गज्या मारणे टोळीकडून मंत्री मोहोळ यांच्या कर्मचार्‍याला बेदम मारहाण…

कराड-मुंडेंच्या बातम्या का बघतो? म्हणून बेदम मारहाण; आरोपी कर्नाटकमधून ताब्यात…

धक्कादायक! पुणे शहरात हॉर्न वाजवल्यावरून तिघांना फायटर सारख्या शस्त्राने मारहाण…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka