Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बिहारमधील शिक्षकाने पुण्यात येऊन चिरला पत्नीच्या प्रियकराचा गळा अन्.

बिहारमधील शिक्षकाने पुण्यात येऊन चिरला पत्नीच्या प्रियकराचा गळा अन्.

पुणे : बिहारमधील एका सरकारी शाळेतील शिक्षकाने पुणे शहरात येऊन पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला. पत्नीचा खून करण्यासाठी बिहारला निघालेल्या पतीस पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कल्याणमध्ये बेड्या ठोकल्या आहेत.

राजीव कुमार असे आरोपी शिक्षकाचे नाव असून, त्याने मित्र धीरज कुमारच्या साथीने हे कृत्य केले आहे. प्रविण महतो असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे.

राजीव कुमार याचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पण, पती-पत्नी गेल्या चार वर्षांपासून विभक्त झाले होते. पत्नीच्या संपर्कात बिहारमधील घराशेजारी राहणारा पण पुण्यात नर्सरी चालवणारा प्रविण आला. दोघांमध्ये संवाद होऊ लागला. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रविण बिहारला गेला की दोघांच्या भेटीगाठी होऊ लागल्या. दीड महिन्यांपूर्वी पत्नी आणि प्रविणच्या भेटीतील एक फोटो राजीने पाहिला होता. यानंतर त्याने पत्नी आणि प्रविणचा काटा काढायचा कट रचला.

राजीवने प्रविणच्या पुण्यातील नर्सरीवर काम करून बिहारला परतलेल्या धीरजचा शोध घेतला. दोघे रेल्वेनी सोमवारी आले. मंगळवारी रात्री 12च्या सुमारास दोघे बावधन येथील नर्सरीवर पोहचले आणि त्यांनी प्रविणचा गळा चिरला. प्रविणचा खून केल्यानंतर दोघे पुणे रेल्वे स्टेशनला आले. दोघांनी पुढे पत्नीचा खून करण्याचे ठरवले आणि पुणे स्टेशनवरून बिहारकडे निघाले होते. दुसरीकडे बावधनमध्ये एकाची हत्या झाल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना समजली होती.

हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हातात कोणताही पुरावा नव्हता. पण, प्रविणच्या अनैतिक संबंधांबाबत पोलिसांच्या हाती माहिती लागली. मग तपास त्या दृष्टीने सुरु झाला. राजीवचे लोकेशन काढले असता, तो पुण्यात आल्याचे आणि बिहारला पळून जात असल्याचे निदर्शनास आले. हिंजवडी पोलिसांच्या पथकांनी तत्काळ मुंबईच्या दिशेने कूच केली. कल्याण पोलिसांनाही याबाबत कळवले. कल्याण पोलिसांनी रेल्वे स्टेशन गाठले. बुधवारी सकाळी राजीव आणि धीरज बिहारच्या रेल्वेत बसणार होते, तत्पूर्वीच कल्याण पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कल्याण पोलिसांच्या मदतीने अवघ्या नऊ तासांत या खूनाचा पर्दाफाश केल्यामुळे पुढील एक जीव वाचला. काही मिनिटं उशीर झाला असता तर राजीवने बिहारमध्ये पोहचून पत्नीचाही खून केला असता. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

पुणे हादरलं! प्रेयसीची हत्या करून मृतदेह रिक्षासह आईच्या दारात सोडून प्रियकर फरार…

धक्कादायक! मुलीला आणि प्रियकराला पहाटेच्या सुमारास नको त्या अवस्थेत पाहिले अन्…

नागपूर हादरलं! प्रियकर विवाहित तर प्रेयसी अनविवाहित अखेर…

प्रियकरसाठी मातेने केली स्वतःच्या मुलीची गळा चिरून हत्या…

नाशिकमध्ये प्रियकराला संपवण्यासाठी शिक्षिकेने दिली विद्यार्थ्यांनाच सुपारी…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka