Dailyhunt
नाशिकमध्ये प्रियकराला संपवण्यासाठी शिक्षिकेने दिली विद्यार्थ्यांनाच सुपारी.

नाशिकमध्ये प्रियकराला संपवण्यासाठी शिक्षिकेने दिली विद्यार्थ्यांनाच सुपारी.

नाशिक : नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये गगन कोकाटे (वय 26) या पोलीस पूत्राच्या हत्येची घटना बुधवारी (ता. २१) सकाळी घडली होती. या हत्येचा उलगडा करताना पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गगन कोकाटे या मृत युवकाचे त्याच्याच परिसरात राहणाऱ्या 39 वर्षीय शिक्षिकेसोबत प्रेम संबंध होते, मात्र गगनकडून या महिलेला त्रास दिला जात होता. प्रियकराला संपवण्यासाठी शिक्षिकेनेच विद्यार्थ्यांना सुपारी दिल्याची माहिती पुढे आली आहे.

शिक्षिकी पेशाला काळीमा फासणारी ही घटना आहे. विद्यार्थ्यांना चांगले वागणुकीचे धडे देणारीच शिक्षिकाच या घटनेत मास्टरमाईंट असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. प्रियकराच्या हत्येसाठी आपल्या विद्यार्थ्यांनाच महिला शिक्षिकाने दोन लाख रुपयांची सुपारी दिली होती. नाशिक पंचवटी पोलिसांनी अवघ्या 5 तासात या घटनेचा छडा लावून आरोपी शिक्षिकेला अटक केली आहे.

नाशिक शहरातील पंचवटी परिसरात एका युवकाची डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. यासंदर्भात नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची हत्या करण्यात आली असून, हत्या झालेल्या युवकाचे नाव गगन कोकाटे असल्याचे उघडकीस आले. गगन हा राहणार मसरूळ परिसरातील होता, त्याच्या शेजारीच राहणाऱ्या आरोपी भावना कदम या शिक्षकेशी ओळख झाली आणि दोघांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र, या प्रेमप्रकरणात गगन हा वारंवार भावना यांना भेटण्यासाठी त्रास देत असायचा, त्याचा राग मनात धरून चक्क शिक्षिका असलेल्या भावना कदम हिने गगनचा काटा काढण्यासाठी आपल्याच विद्यार्थ्यांच्या मित्रांना दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी अवघ्या पाच तासात मारेकरी ताब्यात घेतले आहे. यात दोन विधीसंघर्षित बालकांसह 5 जणांना अटक केली आहे. यात संकेत दिवे (वय 20) मेहफूज सय्यद (वय 18), रितेश सपकाळे (वय 20) गौतम दुसाने (वय 18) आणि मुख्य आरोपी भावना कदम यांना ताब्यात घेतले आहे. मात्र, या घटनेमुळे नाशिक शहरातील शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

The post नाशिकमध्ये प्रियकराला संपवण्यासाठी शिक्षिकेने दिली विद्यार्थ्यांनाच सुपारी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka