पुणे (सुनिल सांबारे): पुणे शहर पोलिसांनी ऑनलाईन आर्थिक फसवणूकीच्या गुन्हयातील फसवणूकीच्या रक्कमा ट्रान्सफर करण्याकरीता बँक खाती, सिमकार्ड उपलब्ध करुन देणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीच्या सदस्यांना अटक करुन त्यांचे नेटवर्क ची साखळी उध्वस्त केले आहे.
पोलिस पुढील तपास करत आहेत.
सायबर पोलिस स्टेशन, पुणे शहर येथे दाखल असलेला गुरनं ४५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१९(२), ३१८(४), ३१६ (५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६-ड या गुन्हयातील फिर्यादी यांना "TRASHOONYA" या कंपनीचे मार्फतीने ऑनलाईन शेअर ट्रेडिंग केल्यास त्यांना मोठया प्रमाणात फायदा होईल,
असे आमिष सदर कंपनीचे एजंट दिव्यांशी अग्रवाल, अशोक रेड्डी यांनी दाखवले. सदर गुन्हयातील आरोपींनी रेग्यूलर कॉल व्दारे तसेच वॉट्सअप चॅटव्दारे संपर्क साधून त्यांना त्यांचे व्हॉटसअॅप मेसेज द्वारे दिलेल्या लिंक वर क्लिक करून त्यांचे "TRASHOONYA" या नावाचे अॅप त्यांचे मोबाईल मध्ये डाऊनलोड करावयास लावून विविध कंपन्यांचे शेअर्स व आयपीओ खरेदी करण्याचे बहाण्याने फिर्यादी यांची एकूण ६०,२०,०००/- रूपयांची फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचे तपासात फिर्यादी यांच्या एकूण फसवणूकीच्या रक्कमेपैकी रक्कम रु. १४ लाख ३० हजार ही ए यू स्मॉल फायनान्स बँकेच्या खात्यावर ट्रान्सफर झाली होती. सदरचे खाते हे आदियोगी स्क्रॅप अॅड वेस्ट मॅनेजमेन्ट एलएलपी, शिवणे पुणे येथील असल्याने सदर कंपनीचा डायरेक्टर अनिकेत प्रशांत भाडळे, शिवाजीनगर गावठाण, पुणे यास ताब्यात घेवून त्यास सदर गुन्हयात दि. २२/०६/२०२५ रोजी अटक करण्यात आली. त्याचेकडे तपासा दरम्यान त्याचे सदरचे बँक खाते सिंहगड रोड येथील ऑफीस मधून आकाश मोरे हा वापरत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर सदर गुन्ह्याचा सखोल तपास करीत असताना काही नेपाळी व्यक्ती नऱ्हे येथे हॉटेल मध्ये राहत असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलिस पथकाने त्यांच्याकडे गुन्ह्यासंदर्भात
तपास केला असता त्यांची नावे १) नोरबु शेर्पा, वय २८ वर्षे, रा. गाव टॅप्टींग, जिल्हा सोलुंखुबू, नेपाळ २) अंग नुरी शेर्पा, वय २१ वर्षे, रा. जिल्हा ओखलडुंगा, गांव खिजीदेम्बा, नेपाळ. सदर चारही इसमांचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली.
सदर गुन्हयामध्ये आत्ता पर्यत १० मोबाईल फोन, १० पेन ड्राईव्ह, ०१ बँकेचे स्वाईप मशिन, ०४ लॅपटॉप, ५३ विविध बँकांचे डेबीट कार्ड, १७४ विविध कंपन्यांचे सिमकार्ड, ५५ विविध बँकांचे चेकबूक, ०१ सीपीयू, ३९ विविध कंपन्यांचे शिक्के, ०२ राऊटर, २७ विविध बँकांचे मोकळे चेक, ०४ हार्ड डिस्क, ०७ सीडी/डीव्हीडी, २७ नग क्यूआर कोड व ०१ डीव्हीआर असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी आकाश दिलीप मोरे (वय ३७ वर्षे, रा. व्हेनिस मॅजिस्टीक, धायरी पुणे) हा फरार असून त्याचा व इतर साथिदारांचा शोध घेवून गुन्हयाचा पुढील तपास करीत आहोत.
सदरची कारवाई अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, पोलिस सह आयुक्त, पंकज देशमुख, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, विवेक मासाळ, पोलिस उपआयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, मच्छींद्र खाडे, सहाय्यक पोलिस आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, व स्वप्नाली शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस स्टेशन, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक संगिता देवकाते, सायबर पोलिस स्टेशन, पुणे शहर, सपोफौ. संदेश कर्णे, पोलिस अंमलदार प्रविणसिंग राजपूत, राजूदास चव्हाण, अमर बनसोडे, जान्हवी भडेकर, प्रशांत बोऱ्हाडे, बाळासो चव्हाण, नवनाथ कोंढे, सचिन शिंदे, अनिकेत
भिंगारे, आदनान शेख, श्रीकृष्ण नागटिळक, अमोल कदम, संदिप पवार, सतीशकुमार मांढरे, संदिप मुंढे, संदिप यादव, कौशल्या भांगिरे, निलम नाईकरे या पोलिस पथकाने यशस्वी रित्या पार पाडली आहे.
दरम्यान, सायबर पोलिस स्टेशन पुणे शहर हे जनतेस शेअर ट्रेडिंग मध्ये जास्त परताव्याचे आमिष, अटकेची भिती, पार्सल मध्ये ड्रग्ज, इलेक्ट्रीसीटी / गॅस कनेक्शन बंद होईल, ऑनलाईन बँक केवायसी अपडेट अशी प्रलोभने व धमक्यां प्राप्त झाल्यास तात्काळ नजिकच्या पोलिस ठाणेस संपर्क साधावा जेणेकरुन आपली फसवणूक टाळता येईल असे आवाहन करीत आहे.
Digital Arrest! IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर; कोटींचा गंडा…
पुणे! फेक प्रोफाईल तयार करून महिलेला कोट्यावधी रुपयांना फसवलं…
लग्नाळू आजी-आजोबांची उतारवयात बहरली लव्ह स्टोरी अन् एक दिवस…
Cyber Crime! पुणे शहरात सायबर फ्रॉडचे मोठे रॅकेट उघडकीस…
पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
पुणे शहरात बनावट नोटा छापणा-या टोळीचा सायबर पथकाकडून पर्दाफाश…
सायबर मर्डर! पुण्यातील उद्योगपतीचं पटना एअरपोर्टवरून अपहरण अन् हत्या…
Cyber Crime! पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारे ताब्यात…
Cyber Crime! पोलिसकाकाच्या खात्यातून 2.3 लाख गायब; कसे गेले पाहा…
Cyber Crime! युवतीला विवस्त्र होण्यास सांगून केलं चित्रीकरण अन्…
The post Cyber Crime! पुणे सायबर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय टोळीचे नेटवर्क केले उद्ध्वस्त… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

