Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
धक्कादायक! डॉक्टर मोबाईलमध्ये पाहून करत होता शस्त्रक्रिया अन्.

धक्कादायक! डॉक्टर मोबाईलमध्ये पाहून करत होता शस्त्रक्रिया अन्.

पाटणा (बिहार): कथित डॉक्टर अजित कुमार पुरी याने यू ट्यूब वरील व्हिडीओ पाहून 15 वर्षांच्या मुलाचे किडनी स्टोनचे ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे त्या मुलाची तब्येत बिघडली.

मुलाला रुग्णवाहिकेतून पाटणा येथे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण, रस्त्यात असताना त्या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर डॉक्टर फरार झाला आहे.

छपरा मधील गडखा येथील मोतीराजपूर येथील श्री गणपती सेवा सदनच्या नर्सिंग हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर कथित डॉक्टर आणि त्याचे साथीदार फरार झाले आहेत. मुलाचा मृत्यू झाल्यानं त्याचे कुटुंबीय आक्रमक झाले आहेत. मुलाच्या नातेवाईकांनी दावा केला की, डॉक्टर मोबाईलवर व्हिडीओ पाहून ऑपरेशन करत होता. मुलाची प्रकृती बिघडली तेव्हा त्याने स्वत:रुग्णवाहिका बोलावून घेतली आणि पाटणाकडे रवाना झाला. मात्र, रस्त्यातच मुलाचा मृत्यू झाला आहे.

चंदन साह (वय १५) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेनंतर मुलाच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. अजित कुमार पुरी आणि त्याचे इतर साथीदार फरार झाले. मृत मुलाचे नातेवाईक मृतदेह घेऊन श्री गणपती सेवा सदन नर्सिंग होम येथे आले आणि त्यांना जोरदार आक्रोश केला. यानंतर गडखा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला, त्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. एसपी कुमार आशिष यांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौकशी सुरु आहे.

दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का?

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप…

पुणे अपघातातील धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलणारा डॉक्टर लागला घडाघडा बोलायला…

कोल्हापूरमध्ये गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश, डॉक्टरसह चौघांना अटक…

डॉक्टर नवरा अनेक महिलांशी चॅटिंग करायचा अन् एके रात्री…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka