Dailyhunt
धक्कादायक! लग्नानंतर दोन तासातच नवरदेवाने उचलले मोठे पाऊल.

धक्कादायक! लग्नानंतर दोन तासातच नवरदेवाने उचलले मोठे पाऊल.

खनौ (उत्तर प्रदेश): लग्नसोहळा उत्साहात पार पडल्यावर दोन तासांत नवरदेवाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नसून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

इटावा येथील उसराहार पोलिस स्टेशनच्या हद्दीतल्या शिवरा गावात लग्नानंतर वधूची सासरी पाठवणी केल्यावर दोन तासांत नवरदेवाने गळफास आत्महत्या केली. शिवरा गावातील निवृत्त जवान ज्ञान सिंह यादव यांचा धाकटा मुलगा सतेंद्र यादवचा विवाह ताखा परिसरातल्या रतनपूर गावातल्या विनिता नावाच्या युवतीशी झाला होता. दोन जुलै रोजी लग्नाचे वऱ्हाड शिवरा गावातून रतनपूरला गेले. विवाह सोहळा झाल्यावर तीन जुलैला दुपारी दोन वाजता वधूसह वऱ्हाडी शिवरा गावात परतले. संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास घराच्या वरच्या मजल्यावर सतेंद्र यादव याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

'Crime Reporting' Online अभ्यासक्रम अन् 'कमवा आणि शिका'ची संधी!

नवऱ्या मुलाने आत्महत्या केल्याचे समजताच कुटुंबाला मोठा धक्का बसला. वधूची प्रकृती बिघडली. पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून घटनास्थळाची बारकाईने पाहाणी केली. या पथकाने घटनेशी संबंधित काही छायाचित्रं काढली. त्यानंतर सतेंद्रचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी इटावा इथल्या शवविच्छेदन केंद्रात पाठवला आहे.

सतेंद्रचा थोरला भाऊ जितेंद्र यादवने सांगितले, ‘विवाहामुळे सतेंद्र खूप आनंदी होता. त्याने डीजे वाजवण्याबाबत कुटुंबीयांशी चर्चा केली होती; पण वधू सासरी पोहोचताच दोन तासांनी तो आत्महत्या करील असे कोणालाही वाटले नाही. वधू सासरी आल्यावर कुटुंबात अशी कोणती चर्चा किंवा घटनादेखील घडली नाही, जेणेकरून तो असं पाऊल उचलेल.’ दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

धक्कादायक! लग्नासाठी तयार होत असलेल्या प्रेयसीचा पाठलाग केला अन्…

हृदयद्रावक! लग्नानंतर चौथ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू…

नवरा तिसरं लग्न करत असतानाच दोघी मंडपात पोहोचल्या अन्…

जावई म्हणतो सासूला; मला तुझ्याशीच लग्न करायचेय…

पुणे जिल्ह्यात लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या; कारण सांगितले…

The post धक्कादायक! लग्नानंतर दोन तासातच नवरदेवाने उचलले मोठे पाऊल… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka