Dailyhunt
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केलेल्या युवकाची आत्महत्या.

धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केलेल्या युवकाची आत्महत्या.

जालना : छत्रपती संभाजीनगर या नामफलकाच्या बोर्डखाली लघुशंका करतानाचा दोन मित्रांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. यानंतर त्यांना धमक्याही येऊ लागल्यामुळे त्यांनी माफीनाम्याचा व्हिडिओ बनवत माफी मागितली होती.

पण, तरीही धमक्या थांबत नसल्याने महेश आडे (वय २८, रा. जालना) या युवकाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सोशल मीडियातून होत असलेल्या ट्रोलिंगमुळे युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ढोकमळ तांडा (जि. जालना) येथे घडली. त्यानंतर, व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करा, धमकी देणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करत कुटुंबीय व नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली आहे. आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दोन तरुण छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावरील संभाजीनगर नावाच्या पिवळ्या बोर्डखाली लघुशंका करताना आढळून आले होते. त्यावेळी, तिथे एका युवकाने या लघुशंका करणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ काढला होता. लघुशंका करणारे दोन्हीही युवक नशेत असल्याचे समोर आले होते. या दोन्हीही तरुणांचा दुसऱ्या दिवशी माफीचा एक व्हिडिओ देखील समोर आला होता. त्यामध्ये, दोन्ही युवकांनी त्यांच्याकडून झालेल्या चुकीबद्दल माफी मागितली होती.

संबंधित व्हिडिओ अनेक इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हायरल करण्यात आले. त्यामुळे, रोज धमकीचे मेसेज आणि फोन येत होते. या धमक्यांना कंटाळून महेश आडे या युवकाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. तत्पूर्वी, हे सगळं मला सहन होत नाही. त्यामुळे मी आत्महत्या करीन असे महेश आडे याने मित्रांजवळ बोलूनही दाखल होते. त्यानंतर, विहिरीत उडी घेऊन त्याने आत्महत्या केली.

सातारा! महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला आता नवं वळण…

पुणे! भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी भावाची आत्महत्या; ताई त्यांना सोडू नको…

विवाहित महिलेशी प्रेमसंबंध अन् आत्महत्या; पाहा WhatsApp स्टेटस मेसेज…

पुणे! NDA मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या…

IAS पत्नी जपान दौऱ्यावर असताना IPS अधिकाऱ्याची आत्महत्या…

Loading…

The post धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केलेल्या युवकाची आत्महत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka