लखनौ (उत्तर प्रदेश) : इटावामध्ये लालपुरा भागात राहणाऱ्या सराफा व्यापाऱ्याची पत्नी आणि तीन मुलांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सराफा व्यापारी मुकेश वर्मा याने आपली पत्नी आणि तीन मुलांची हत्या केली असल्याचे पोलिस तपासादरम्यान सांगितले.
मुकेश याने प्रथम पत्नी रेखा (45 वर्ष), मुलगी भाव्या (20 वर्ष), मुलगी काव्या (16 वर्ष) आणि मुलगा (11 वर्ष) यांना झोपेची गोळी दिली आणि बेशुद्ध केले. यानंतर त्याने एक-एक करून चौघांचा गळा घोटल्याचे सांगितले. पत्नी आणि तीन मुलांची हत्या केल्यानंतर मुकेश वर्माने स्वत:चं आयुष्य संपवण्याचाही प्रयत्न केला, यासाठी तो रेल्वे ट्रॅकवरही पोहोचला, पण जीआरपीने त्याला वाचवले. कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावामुळे आपण हे पाऊल उचलल्याचे मुकेश वर्मा याने सांगितले.
कुटुंबासोबत बराच काळ वाद सुरू असल्यामुळे सर्वांनी संपावे, अशी माझी इच्छा आहे, असे पत्नीला सांगितले. तू संपशील तेव्हा आम्हालाही सोबत ने, कारण तुझ्यामागे कुटुंबाला बघायला कुणीही नाही. मुलंही एवढी मोठी झाली नाहीत की ते नोकरी करून घर चालवू शकतील, असे उत्तर पत्नीने दिल्याचे मुकेश वर्मा यांनी पोलिसांना सांगितले.
मुलांचे खर्चही खूप जास्त आहेत, त्यामुळे तुला स्वत:ला संपवायचं असेल तेव्हा आम्हालाही संपव. एकदा करवाचौथ होऊ दे, त्यानंतर कर आता डोकं चालवू नको. यानंतर आम्ही कानपूरला गेलो, परत आल्यानंतर कट रचला. फार त्रास होणार नाही, असे कर असे पत्नीने सांगितले. यानंतर मी झोपेचे औषध दिले. कारण 2003 साली जेव्हा पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला तेव्हा तिनेही झोपेची गोळी मागितली होती, अशी धक्कादायक कबुली मुकेश वर्माने दिली आहे.
झोपेची गोळी देऊनही मृत्यू न झाल्यामुळे दोरीने पहिले बायकोचा गळा घोटला, त्यानंतर मुलांच्या गळ्याला दोरी लावली, तेव्हा त्यांनी काय करताय? असं विचारलं. मुलांच्या तोंडावर हात ठेवला आणि मी एकटा जाणार नाही, तुम्हाला घेऊन जाईन, असे सांगितले. माझ्यावरून ट्रेनचे 7 डबे गेले पण मी वाचलो, असेही मुकेश वर्माने पोलिस तपासात कबूल केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
Cyber Crime! Whatsapp वर लग्नाचं निमंत्रण आलं तर सावधान…
पोलिस अधिकाऱ्याला वहिनीसोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडले अन्…
Video: उकळत्या दुधाच्या कढईवर गेला तोल अन् गेला जीव…
प्रेम प्रकरण! योगा टीचरला विवस्त्र करून जमिनीत पुरलं पण जिवंत बाहेर आली अन्…
Video: हलक्या काळजाचे असाल तर हा व्हिडीओ पाहू नका…
The post धक्कादायक! थरकाप उडवणारी चौघांच्या हत्येची स्टोरी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

