Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
धक्कादायक! वहिनीने मध्यरात्रीच्या सुमारास दिराला बेडरुममध्ये बोलावलं अन्.

धक्कादायक! वहिनीने मध्यरात्रीच्या सुमारास दिराला बेडरुममध्ये बोलावलं अन्.

भोपाळ (मध्य प्रदेश): वहिनीने मध्यरात्रीच्या सुमारास दिराला बेडरूममध्ये बोलावले आणि दिराचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना सिधी जिल्ह्यातील वनांचल कुसमी येथे घडली आहे. जमिनीच्या वादातून दिराचे गुप्तांग कापल्याचे महिलेने पोलिसांना तपासादरम्यान सांगितले.

वहिनीने दिराचं गुप्तांग कापल्यानंतर तो वेदनेनं विव्हळतच रुमच्या बाहेर पळाला. कुटुंबियांना या बद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जखमी दिराला कुसमी सामुदायिक स्वास्थ्य केंद्रात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी देखील घटनास्थळावर धाव घेतली. तसेच दिराच्या तक्रारीवरुन त्याच्या वहिनी विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

पोलिस अधिकाऱ्यानं सांगितले की, ‘संबंधित युवकाने त्याच्या गुप्तांगावर त्याच्या वहिनीनं वार केल्याचा आरोप केला आहे. पोलिस या प्रकरणी चौकशी करत आहेत. आरोपी महिलेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जखमी दिराकडे चौकशी केल्यानंतर जमिनीच्या वादातून हा हल्ला झाला असल्याचे समोर आले आहे. गावातील लोकांमध्ये या घटनेबद्दल विविध चर्चा सुरु आहेत. पोलिसांनी आरोपी महिलेची देखील चौकशी सुरू केली आहे. संबंधित महिला व तिच्या दिरामध्ये जमिनीवरून नेमका काय वाद होता? याची माहिती पोलिस घेत आहेत.’

दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा प्रकार जमिनीच्या वादातून घडला असल्याचं समोर आलs आहे. मात्र यामागे आणखी दुसरे काही कारण आहे का, याचाही तपास पोलिस करीत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka