Dailyhunt
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला अखेर नोटीस; मुख्यमंत्री म्हणाले.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला अखेर नोटीस; मुख्यमंत्री म्हणाले.

पुणे : पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी संतापाची लाट पसरली आहे. हॉस्पिटल रुग्णालयाबाहेर आज विविध पक्षांनी व महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन करत रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आरोग्य उपसंचालक कार्यालायाने मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये बॉम्बे नर्सिंग ॲक्टच्या तरतुदींच उल्लंघन केल्याने आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ही नोटीस देण्यात आली आहे. २४ तासांच्या आत तातडीने या प्रकरणात अहवाल सादर करण्याची तंबी ही या नोटीसमध्ये देण्यात आली आहे.

आरोग्य विभागाकडून दीनानाथ रुग्णालयाला नोटीस देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र अधिसुना दिनांक १४ जानेवारी २०२१ मधील नियम ११ (जे) मधील अनु,क्रंमाकर १ ते ३ पालन करण्यास कसुर झालेले दिसून येत आहे. सदर बाब गंभीर स्वरुपाची असून दी बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अॅक्ट १९४९ आणि महाराष्ट्र शासन अधिसुचना १४ जानेवारी मधील तरतुदीचे उल्लंघन करणारी आहे. सबब, आपणास या नोटीशीद्वारे कळविण्यात येते की, ही नोटीस प्राप्त होताच २४ तासांच्या आता वस्तुस्थितीदर्शक अहवाल संबंधित डॉक्टांचे खुलासा पत्रासह या कार्यालयाास सादर करण्यात यावा, असे म्हटले आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकारची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेत या चौकशी समितीत उपसचिव श्रीमती यमुना जाधव, सह कक्षप्रमुख तथा कक्ष अधिकारी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांचे प्रतिनिधी, सर जे. जे. रुग्णालय समूह, मुंबईचे अधीक्षक हे सदस्य असतील तर विधी आणि न्याय विभागाचे उपसचिव/अवर सचिव हे या चौकशी समितीचे सदस्य सचिव असतील. त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या धर्मादाय रुग्ण योजनेची सर्व धर्मादाय रुग्णालयांकडून प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रधान सचिव विधी व न्याय विभाग तसेच धर्मादाय आयुक्त यांना खालील प्रमाणे सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे.

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती मृत्यू प्रकरणी दिले स्पष्टीकरण…

पुणे! गर्भवतीच्या उपचारासाठी रग्णालयाने मागितले 10 लाख, महिलेचा मृत्यू…

रुबी हॉल रुग्णालयातील महिला कर्मचाऱयाची आत्महत्या; एचआर हेडसह दोघांविरुद्ध गुन्हा…

खाजगी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा तासाभरातच मृत्यू…

ससूनचा कारभार! दिशा भोईटे प्रकरण अद्याप संपलेले नाही…

दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का?

मुलाच्या मृत्यूनंतर तब्बल 11 दिवस ठेवले व्हेंटिलेटरवर; सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल…

The post दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला अखेर नोटीस; मुख्यमंत्री म्हणाले… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka