Dailyhunt
दोन भावांची भांडणं सोडवणं बेतलं मित्राच्या जीवावर; क्षणात गेला जीव.

दोन भावांची भांडणं सोडवणं बेतलं मित्राच्या जीवावर; क्षणात गेला जीव.

सांगली : दोन भावांमध्ये सुरु असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका मित्राचाच खून झाल्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पेठ येथे घडला आहे. सचिन सुभाष लोंढे असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गुन्हा दाखल झाला आहे.

संग्राम शिंदे आणि शरद शिंदे या भावांमध्ये भांडण सुरू होते. यावेळी सचिन भांडण सोडवायला गेला असताना हा खून झाला आहे. या खूनप्रकरणी संग्राम कमलाकर शिंदे याला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

संग्राम शिंदे आणि शरद शिंदे हे भाऊ पेठ येथे वास्तव्यास आहेत. या दोघांच्या शेजारीच सचिन लोंढे यांचे घर असून हे तिघे मित्र आहेत. शिंदे भावामध्ये मंगळवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास भांडण सुरू होते. सचिन लोंढे व त्याचे मित्र विश्वजीत शिंदे, शाकिर शिंदे, ऋषिकेश वारे हे भीमनगर परिसरात उभा होते. तेथून शरद शिंदे व संग्राम यांची बहिण मयुरी हे दोघे त्यांचे घरी निघाले होते. त्यावेळी संग्राम शिंदे हा दुचाकीवरून हातामध्ये चाकू घेवून तेथे गेला. संग्राम व शरद यांच्यामध्ये वादावादी झाली. त्यानंतर, दोघांत शिवीगाळी सुरू झाली. शरद व संग्राम यांच्यात जोरात भांडण सुरू झाले. त्यावेळी तेथे असलेला सचिन हा भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेला. मात्र, संग्रामने, तू आमच्या भांडणामध्ये यायचे नाही, असे म्हणून हातातील चाकू सचिनच्या छातीत खुपसला. चाकूचा घाव वर्मी लागल्याने तो खाली पडला. सचिन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून संग्रामने तेथून पळ काढला. दरम्यान, तेथील मित्रांनी जखमी सचिनला इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

नवी मुंबईत पोलिसांनी दरवाजा उघडला अन् आढळा माय-लेकाचा मृतदेह…

पिंपरीमधील पोलिसकाकाचा बंदोबस्तावरून घरी जाताना अपघाती मृत्यू…

हृदयद्रावक! सांगलीतील एकाच कुटुंबातील 6 जणांचा अपघातात जागीच मृत्यू; पाहा नावे…

सांगलीत दुचाकी अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू…

सांगली जिल्ह्यात माजी उपसरपंचाची रस्त्यातच गळा चिरून हत्या…

सांगलीत सिनेस्टाईल पद्धतीने नंग्या तलवारी नाचवल्या; युवकाची हत्या…

The post दोन भावांची भांडणं सोडवणं बेतलं मित्राच्या जीवावर; क्षणात गेला जीव… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka