मुंबई : नवी मुंबईच्या कामोठे सेक्टर 6 मधील ड्रीम्ज अपार्टमेंटमधील घरात आई आणि मुलाचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे. मुलाच्या अंगावर मारल्याचे व्रण दिसत आहेत. गीता भूषण जग्गी (वय ७०) आणि त्यांचा मुलगा जितेंद्र भूषण जग्गी (वय ४५) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
ड्रीम्ज हाऊसिंग सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील रूम नंबर 104 मध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. बुधवारी संध्याकाळी घरातून गॅस गळती होत असल्याचे लक्षात आल्यानंतर इमारतीतील रहिवाशांनी दार वाजवलं, पण कुणीही दार उघडलं नाही, त्यामुळे रहिवाशांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना बोलावले.
पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान सोसायटीमध्ये दाखल झाले. घर आतून बंद असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी एका बेडवर महिलेचा तर दुसऱ्या बेडवर त्यांच्या मुलाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला. महिलेच्या अंगावर कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत, मात्र, मुलाच्या चेहऱ्यावर मारल्याचा जखमा आढळून आल्या आहेत. फॉरेन्सिक टीमकडून घराची तपासणी करण्यात येत आहे.
पोलिसांनी दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आल्यानंतरच ही हत्या आहे का आत्महत्या, हे समजू शकेल. पोलिसांनी सोसायटीचे सीसीटीव्ही चेक करायला सुरूवात केली आहे. पुढील तपास नवी मुंबई पोलिस करत आहेत.
पुणे शहरातील पोलिसकाकाच्या प्रसंगावधानाने वाचले युवतीचे प्राण!
पिंपरीमधील पोलिसकाकाचा बंदोबस्तावरून घरी जाताना अपघाती मृत्यू…
भोंदूबाबा महिलेला काही टेन्शन घेऊ नकोस असं म्हणाला अन् खोलीमध्ये गेल्यावर…
धक्कादायक! पुणे शहरात शिक्षिकेने शाळेतच ठेवले विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध…
अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या चालकाला अपघात प्रकरणी केली अटक…
The post नवी मुंबईत पोलिसांनी दरवाजा उघडला अन् आढळा माय-लेकाचा मृतदेह… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

