Dailyhunt
ड्युटी संपवून घरी निघालेल्या पोलिसकाकाचा लोकलमधून पडून मृत्यू..

ड्युटी संपवून घरी निघालेल्या पोलिसकाकाचा लोकलमधून पडून मृत्यू..

मुंबईः एका पोलिस कर्मचाऱ्याचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी भांडुप आणि नाहूर रेल्वे स्थानक दरम्यान घडली आहे. याबाबत कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे.

अमित ज्ञानेश्वर गोंदके, असे या मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अमित ज्ञानेश्वर गोंदके हे बुधवारी रात्री अंधेरी लोहमार्ग पोलिस ठाणे येथून आपली ड्युटी संपवून डोंबिवली येथे जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करत होते. लोकल मधून पडून गोंदके हे गंभीर जखमी झाले. गोंदके हे रात्रभर रेल्वे रुळावरच जखमी अवस्थेत पडून राहिल्यामुळे आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अमित ज्ञानेश्वर कोंदके हे अंधेरी लोहमार्ग पोलिस ठाण्यात सेवेला होते. ड्युटी संपल्यानंतर ते आपल्या डोंबिवली येथील घराकडे जाण्यासाठी निघाले होते. घाटकोपरपर्यंत मेट्रोने प्रवास करून पुढे घाटकोपरवरून डोंबिवलीकडे जाणारी लोकल पकडली. मात्र भांडुप आणि नाहूर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे दरवाजातून पडून ते गंभीर जखमी झाले. रेल्वेतून पडल्यामुळे त्यांचा एक हात खांद्यापासूनच तुटून वेगळा झाला. शिवाय, त्यांची डोक्याची कवटी फुटून डोक्याला देखील गंभीर इजा झाली होती. मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा देखील उशिराने सुरू असल्यामुळे प्रचंड गर्दीतून घराकडे जात असताना दरवाजात लटकल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

माहूर स्टेशन मास्तर यांनी पंचनामा करून जखमी व्यक्तीच्या हात खांद्यापासून कट झाला व डोक्याला मार लागून आतील कवटी फुटून, अंगावर खरचटले मुसळधार पावसामुळे रेल्वे उशिरा असल्यामुळे प्रचंड गर्दीतील जलद लोकल मधून पडून हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त करून मेमो देऊन रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी सोय केली. एएसआय चव्हाण आणि सोबतच्या हमालांनी गोंदके यांचा मृतदेह मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात पाठवला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नागपूरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिसकाकाचा मृत्यू…

पोलिसांच्या गाडीला ट्रकने दिली धडक; पोलिसकाकाचा मृत्यू…

धक्कादायक! पोलिसकाकाला नाकाबंदीदरम्यान ट्रकने चिरडले…

पोलिसकाकाका विशाल पवार यांच्या मृत्यूबाबत वेगळेच गूढ…

टेम्पोच्या धडकेत जखमी झालेल्या पोलिसकाकाचा अखेर मृत्यू…

The post ड्युटी संपवून घरी निघालेल्या पोलिसकाकाचा लोकलमधून पडून मृत्यू…. appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka