Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नागपूरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिसकाकाचा मृत्यू.

नागपूरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिसकाकाचा मृत्यू.

नागपूर : नागपूरमध्ये भीषण अपघातामध्ये एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहनाने पीएसआय दीपक चोरपगार यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या घटनेत ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत पीएसआय दीपक चोरपगार यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मानकापूर उड्डाणपुलावर घडली आहे. दीपक चोरपगार हे ड्युटीवरून घरी परतत होते. याचवेळी मानकापूर उड्डाणपुलावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदाची धडक दिली, या अपघातामध्ये दुचाकीवरून ते खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला, ते या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पीएसआय दीपक चोरपगार हे धंतोली पोलिस ठाण्यात तैनात होते. गुरुवारी रात्री ड्युटी संपवून घरी दुचाकीवरून जात असताना मानकापूर उड्डाण पुलावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Video: 'खैके पान बनारस वाला' या गीतावर नाचणारे पोलिस कर्मचारी निलंबीत…

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

अहमदनगर जिल्ह्यात निवृत्त पोलिसकाकाचा मृत्यू; महिला ताब्यात…

पोलिसकाकाचा नाईट ड्युटीवरुन घरी जाताना भीषण अपघातात मृत्यू…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka