नांदेड : नागपूर राष्ट्रीय महामार्ग 361 वरील दोन जिल्ह्याच्या व तीन तालुक्याच्या सीमेवर चोरंबा फाटा येथे नाकाबंदी दरम्यान एका ट्रकने पोलिसकाकाला चिरडल्याची घटना घडली आहे. पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला.
अर्धापूर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार राम मुगाजी पवार यांचा मृत्यू झाला आहे. या अपघात प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात ट्रक आणि पिकअप या दोन्ही वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष 'सन्मान योजना'
नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोरंबा फाटा हे दोन जिल्हे आणि तीन तालुके असलेल्या पॉईंटवर मागील काही दिवसांपासून नाकाबंदी चौकी उभारण्यात आली आहे. नागपूर मार्गाकडून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत होती. पोलिसकाका राम पवार हे शनिवारी पिकअप क्रमांक एम. एच – 20 ई. जी.7844 या वाहनाची तपासणी करीत असताना पाठीमागून आलेला ट्रक क्रमांक आर. जे. 09 – जी. सी. 9945 ट्रकने पोलिस हवालदार राम पवार यांना उडविले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना राष्ट्रीय महामार्ग पोलिस केंद्र वसमत फाटा येथील रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालय अर्धापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अप्पर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी नांदेड ग्रामीण यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेऊन पिकअप व ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या अपघात प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात ट्रक आणि पिकअप या दोन्ही वाहन चालकावर आणि वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसकाकाका विशाल पवार यांच्या मृत्यूबाबत वेगळेच गूढ…
पोलिसकाकाचा हर्सूल मध्यवर्ती कारागृहाच्यामागे ठेचून खून…
पोलिसकाकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू…
पुणे शहरातील पोलिसकाकाची गोळी झाडून आत्महत्या…
पोलिसकाकाचा मृतदेह घराच्या अंगणातच झाडावर लटकलेला दिसला अन्…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post धक्कादायक! पोलिसकाकाला नाकाबंदीदरम्यान ट्रकने चिरडले… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

